शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

कल्याणमध्ये भाजपाची साथ ठरणार लाखमोलाची, अंतर्गत नाराजी सेनेसाठी चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 3:02 AM

- प्रशांत माने कल्याण (पूर्व) विधानसभा कल्याण : कल्याण पूर्व मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असला, तरी विधानसभेच्या गेल्या ...

- प्रशांत मानेकल्याण (पूर्व) विधानसभाकल्याण : कल्याण पूर्व मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असला, तरी विधानसभेच्या गेल्या दोन निवडणुकांमध्ये निवडून आलेले अपक्ष उमेदवार गणपत गायकवाड हे भाजपाचे सहयोगी आमदार म्हणून ओळखले जातात. २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर पार पडलेल्या केडीएमसीच्या निवडणुकीत या मतदारसंघातील बहुतांश प्रभागांमध्ये शिवसेनेचे वर्चस्व दिसून आले असले, तरी विधानसभा आणि केडीएमसीतील निवडणुकीत झालेली सरळ लढत पाहता यंदा भाजपाची साथही मोलाची ठरणार आहे.पुर्वीच्या कल्याण विधानसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन कल्याण पूर्व हा वेगळा मतदारसंघ अस्तित्वात आला. महापालिकेचा ‘ड’ प्रभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभागाचे तीन तुकडे होऊन, ड प्रभागाव्यतिरिक्त जे आणि आय प्रभागाची भर पडली. ड प्रभाग जेव्हा अस्तित्वात होता, तेव्हा प्रभागांची संख्या २५ होती. नव्या प्रभाग रचनेनुसार, तसेच २७ गावांच्या केडीएमसीत समावेश झाल्यानंतर प्रभागांची संख्या ३४ झाली. कल्याण पूर्व मतदारसंघाचा आढावा घेता, याची हद्द अंबरनाथ तालुक्यातील हाजीमलंग नेवाळी नाका या परिसरातील काही गावांसह उल्हासनगरमधील पाच प्रभाग याच मतदारसंघात मोडतात. येथे मोठ्या प्रमाणात कोकणी समाजाची मते असून त्याखालोखाल आगरी, बौध्द, उत्तर भारतीय मते आहेत.२००९ मधील विधानसभा निवडणुकीचा आढावा घेता काँग्रेसकडून आर.बी सिंग, शिवसेनेकडून पुंडलिक म्हात्रे आणि अपक्ष म्हणून गणपत गायकवाड या प्रमुख उमेदवारांचा समावेश होता. पूर्वेतील मतदारांनी स्थानिक उमेदवार म्हणून गायकवाड यांना कौल दिला होता. २४ हजार ४७६ च्या मताधिक्याने निवडणूक जिंकलेल्या गायकवाडांची ओळख पुढील पाच वर्षे राष्ट्रवादीचे सहयोगी आमदार म्हणून राहीली; परंतू त्यांनी २०१४ ची विधानसभा निवडणूक पुन्हा अपक्ष म्हणूनच लढविली. त्यावेळी विधानपरिषदेचे आमदार तथा औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ (अप्पा) शिंदे यांचे पुतणे निलेश शिंदे हे राष्ट्रवादीकडून, शिवसेनेतून कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, भाजपाकडून विशाल पावशे तर मनसेचे तत्कालीन नगरसेवक नितीन निकम आणि काँग्रेसकडून विजय मिश्रा रिंगणात होते. निवडणुकीत अपक्ष उमेदवार गायकवाड यांनी पुन्हा विजयश्री खेचून आणली असली, तरी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळालेल्या सेनेच्या गोपाळ लांडगे यांचा अवघ्या ७०० मतांच्या फरकाने पराभव झाला होता.दरम्यान, अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेल्या गायकवाड यांनी ‘जिथे सत्ता त्याला पाठिंबा’ हे समीकरण कायम ठेवत सत्तेतील भाजपाला साथ दिली. आता लोकसभेनंतर येणाºया विधानसभा निवडणुकीत विजयाची हॅट्रिक करु पाहणारे गायकवाड पुन्हा अपक्ष म्हणून लढतात की कोणत्या पक्षाचा हाती झेंडा घेतात हे सध्या तरी अनाकलनीय आहे. त्यामुळे त्यांचा कल कोणत्या पक्षाकडे झुकतो, हे निश्चितच महत्त्वाचे राहणार आहे.या मतदारसंघात १ लाख ८१ हजार १५४ पुरूष तर १ लाख ५२ हजार ६२३ स्त्री मतदार आहेत. तृतीयपंथीयांची मते ८१ आहेत. एकूण मतदार ३ लाख ३३ हजार ९५८ इतके आहेत. यात १८ ते १९ वयोगटातील २ हजार १७८ तरूण मतदार आहेत. मतदारसंघात बेकायदा बांधकामे बेसुमार वाढली असून, परिणामी लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. सदोष पाणी व्यवस्था आणि वितरणातील असमानतेमुळे पाण्याची नेहमीच टंचाई जाणवते. विकास प्रकल्पांची अपूर्ण कामे, मनोरंजन केंद्रांचा अभाव आणि मैदानांची कमतरता असून, वैद्यकीय सुविधांचाही अभाव आहे. आमदार गायकवाड यांच्या निधीतून विकासाची कामे सुरू आहेत, परंतू त्या कामांची रखडगाथा असल्याने समस्या जैसे थे आहेत. याचे खापर गायकवाड महापालिकेवर फोडतात. ते भाजपाबरोबर सत्तेत असल्याने त्यांच्यावतीने विकास कामांचा सपाटा अपेक्षित असताना त्यांच्यावरच विविध नागरी समस्यांप्रकरणी केडीएमसीच्या बाहेर उपोषण छेडण्याची नामुष्की ओढावली होती. २०१४-१५ च्या सुमारास तत्कालीन ड प्रभागाचे समिती अध्यक्ष उदय रसाळ आणि अन्य सदस्यांनी पुर्वेकडील भाग महापालिकेतून वगळण्याचा ठराव पारित केला होता. तरीही मूलभूत सुविधांचा लढा कायमच आहे.राजकीय घडामोडी२०१४ च्या लोकसभा निवडणुकीचा आढावा घेता, गेल्या वेळी या मतदारसंघातून सेनेच्या श्रीकांत शिंदे यांना ६५ हजाराच्या आसपास मते मिळाली होती. यंदाही युतीचे तेच संभाव्य उमेदवार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील हे कल्याण पूर्व मतदारसंघात नवखे असले, तरी २७ गावांमधील १० ते १२ गावांचा या मतदारसंघातील सहभाग पाहता गावे वगळण्याच्या मुद्दा राष्ट्रवादीसाठी महत्वाचा ठरू शकतो.या मतदारसंघातून मते मिळविणे म्हणजे राष्ट्रवादीसाठी तारेवरची कसरत असली, तरी सेनेच्या बालेकिल्ल्यात मध्यंतरी पदे वाटप करणाºयावरून सेनेचे जिल्हाप्रमुख लांडगे यांच्याविरोधात स्थानिक पातळीवर व्यक्त करण्यात आलेली नाराजी सेनेसाठी चिंतन करणारी आहे.

दृष्टिक्षेपात राजकारणकल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेची पकड असली तरी, लोकसभा निवडणुकीचे गणित पाहता भाजपाची साथ या पक्षाला कितपत प्रामाणिकपणे मिळते, यावर बरेच काही अवलंबून असणार आहे.राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार अप्पा शिंदे हे पुर्वेतील नेतृत्व असले, तरी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आलेला नाही. जिल्हा नेतृत्वाचे दुर्लक्ष आणि महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपा आणि सेनेची धरलेली वाट हे मुद्दे पूर्वेत पक्षाच्या पानिपताला कारणीभूत ठरले.गेल्यावेळी विधानसभा निवडणुकीनंतर पार पडलेल्या केडीएमसीच्या सार्वत्रिक निवडणुकीतही युती झाली नव्हती; परंतू त्यावेळी कल्याण पुर्वेतून शिवसेनेचे तब्बल १८ नगरसेवक निवडून आले. बसपाच्या उमेदवार म्हणून निवडून आलेल्या सोनी अहिरे यांचा सेनेला पाठिंबा आहे. भाजपाचे आठ नगरसेवक असून काँग्रेसचा केवळ एकच नगरसेवक आहे.कल्याण पुर्वेतील तलावांचे अस्तित्व धोक्यात आले असून, डंपिंग नसल्याने जागोजागी कचऱ्याचे ढिग होत असल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसते. अतिक्रमणे, पावसाळ्यात तुंबणारी गटारे, नाले, ड्रेनेज सुविधांचा अभाव, नादुरूस्त आणि अरूंद रस्ते यामुळे लोक त्रासले आहेत. या भागातून महापौर, सभापती, विरोधी पक्षनेते, आमदार, खासदार निवडून जाऊनही म्हणावा तसा विकास झालेला नाही. दुरदृष्टी असलेला नेता न मिळाल्याने पूर्वची अवस्था बिकट झाली आहे.

टॅग्स :kalyan-pcकल्याणBJPभाजपाkalyanकल्याणLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकShiv Senaशिवसेना