शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

डोंबिवलीचा बालेकिल्ला भाजपने राखला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 1:16 AM

जातीच्या राजकारणाला मतदारांनी झिडकारले

- अनिकेत घमंडीडोंबिवली : डोंबिवली मतदारसंघातील विजयाची परंपरा कायम राखत भाजपचे रवींद्र चव्हाण यांनी विजयाची हॅट्ट्रिक साजरी केली. चव्हाण यांनी ८६ हजार २२७ मते मिळवत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले मनसेचे उमेदवार मंदार हळबे यांचा ४१ हजार ३११ मतांनी पराभव केला. हळबे यांना ४४ हजार ९१६, तर तिसºया क्रमांकावर राहिलेल्या काँग्रेसच्या उमेदवार राधिका गुप्ते यांनी सहा हजार ६१३ मते मिळवली. नोटाचे प्रमाण वाढले असून चार हजार ९१ मतदारांनी नोटाला पसंती दिली. जनसंघापासून बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघातील विजय स्पष्ट होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

मतमोजणीच्या पहिल्याच फेरीत चव्हाण यांनी पश्चिमेकडील मोठागाव येथून १५०० मतांची आघाडी घेतली. मात्र, तिसºया फेरीत चव्हाण आणि हळबे यांना मिळालेल्या मतांमध्ये अवघे ३४ मतांचे अंतर होते. मात्र, तिन्ही फेऱ्यांमधील १५०० मतांची आघाडी कायम होती. त्यानंतर, चव्हाण यांची आघाडी वाढत गेली. हळबे यांनाही पश्चिमेला चांगली मते मिळाली, पण पूर्वेत भाजपने एकतर्फी वर्चस्व राखले.

हळबे यांना ते ज्या रामनगर या प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडून आले, तेथेही मते मिळाली नसल्याचे निकालाअंती स्पष्ट झाले.काँग्रेसच्या राधिका गुप्ते यांना अवघी सहा हजार ६१३ मते मिळाली. काँग्रेसचे या ठिकाणी तीन नगरसेवक असूनही काँग्रेसला अपेक्षित मते न मिळाल्यामुळे हा धक्का असल्याचे गुप्ते म्हणाल्या. काँग्रेस, बसपा, संभाजी ब्रिगेड, अपक्ष या चारही उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जयराम पवार यांनी दिली.

डोंबिवली या रा.स्व. संघ व भाजपच्या गडात राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचा पराभव करण्याकरिता मनसेने मंदार हळबे या ब्राह्मण तरुणास उमेदवारी दिली. यामुळे ब्राह्मण मते मनसेकडे वळतील, असा राज ठाकरे यांचा होरा होता. मात्र, प्रत्यक्षात भाजप व संघाची मतपेटी अभेद्य राहिली व चव्हाण विजयी झाले.

ठाकरे हे आपण जातपात पाहत नाही, असे सांगतात. त्याचप्रमाणे संघाने कधीही जातपातीचे अवडंबर माजवले नाही. मात्र, मनसेने हळबे विरुद्ध चव्हाण या लढतीत जातीचा फॅक्टर काम करील, असा विचार केला. तो फलद्रुप झाला नाही. शहरातील खड्डे, वाहतूककोंडी, पूलकोंडी, अर्धवट प्रकल्प, १० वर्षांत आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडून न झालेली काही कामे यावरून सोशल मीडियात टीकाटिप्पणी करण्यात येत होती. त्या मुद्द्यांवरून मनसेने चव्हाण यांना घेरण्यापेक्षा जातीच्या फॅक्टरवरून घेरण्याचा प्रयत्न केला व तेथेच मनसेच्या अपयशाचा पाया रचला गेला, असे बोलले जात आहे.

सामान्यांच्या संपर्कात चव्हाण कायम असल्याने त्याचा फायदा त्यांना निवडणुकीत झाला. हळबे यांनी उच्चशिक्षणाच्या मुद्द्यावरूनही चव्हाण यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्याने त्या विषयावरही चर्चा झाली. मात्र, तोही मुद्दा फारसा चालला नाही. लोकसभा निवडणुकीत चव्हाण यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचाराकरिता जीवाचे रान केले. त्यामुळे शेजारील कल्याण पूर्व व पश्चिममध्ये शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष सुरू असताना डोंबिवलीत शिवसेनेने चव्हाण यांना मनापासून साथ दिली.

मात्र, हळबेंना ४४ हजार मते मिळाली असून दिवंगत माजी आमदार हरिश्चंद्र पाटील यांना २०१४ मध्ये मिळालेल्या मतांच्या चारपट आहेत. त्यामुळे चव्हाण यांनी याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. २२० जागा मिळवण्याच्या वल्गना केलेल्या पक्षाची दारुण अवस्था झाली, ते चव्हाण पाहत आहेत. त्यांनी डोंबिवलीकरांच्या मूलभूत समस्यांना हात घातला नाही, तर परिस्थिती गंभीर होऊ शकते. केडीएमसीच्या मागील निवडणुकीत मनसेच्या जागा घटल्या व भाजपच्या वाढल्या. मनसेची वाढलेली मते मागील यश पुन्हा गमावण्याची नांदी ठरणार नाही, याची खबरदारी भाजपला घ्यावी.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019dombivali-acडोंबिवली