शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

भाजपा नगरसेविकेच्या स्थायी समिती सदस्यत्वाचे राजीनामा नाट्य 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 7:55 PM

मीरा भाईंदर महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता असून स्थायी समिती मधून ८ सदस्य निवृत्त होणार आहेत.

मीरारोड - भाईंदर पश्चिम येथील भाजपा नगरसेविका पाय फ्रॅक्चर झाल्याने घरी असताना तिच्या घरी जाऊन तिला स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचे पत्र द्यायला लावण्यात आल्यावरून वाद निर्माण झाला आहे. काल राजीनाम्याचे पत्र देणाऱ्या त्या नगरसेविकेने आज मात्र आयुक्तांना स्वतःच आपले ते पत्र ग्राह्य धरू नये असे कळवले आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्या नगरसेविकेचे राजीनामा पत्र महापौरांच्या दालनात टाईप केले गेले. 

मीरा भाईंदर महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता असून स्थायी समिती मधून ८ सदस्य निवृत्त होणार आहेत. त्या नंतर नवीन सदस्य नियुक्ती सह सभापती निवडणूक लागणार आहे. समितीमध्ये भाजपाचे १० , शिवसेनेचे ४ व काँग्रेसचे २ असे संख्याबळ आहे. त्यामुळे भाजपा मध्ये स्थायी समिती सभापती पदासाठी सुरेश खंडेलवाल, दिनेश जैन, प्रशांत दळवी, ध्रुवकिशोर पाटील आदी इच्छुकांच्या नावाची चर्चा आहे. माजी आमदार नरेंद्र मेहतांनी त्यांची वादग्रस्त व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्याने भाजपच्या पदांचा राजीनामा व राजकारण सोडल्याचे जाहीर केले होते. नंतर त्यांच्यावर बलात्कारचा गुन्हा दाखल झाला. 

तसे असले तरी मेहतांनी भाजपावर आपली पकड कायम ठेवण्याचे प्रयत्न चालवले आहेत. महापौरांच्या दालनात आणि अँटीचेंबरमध्ये बसून आपले अस्तित्व दाखवून देण्याचा  प्रयत्न सुरु आहे. त्यातूनच पालिकेची तिजोरी असलेल्या आणि निविदा मंजुरी कामात महत्वाच्या अशा स्थायी समितीवर आपल्या मर्जीतला सभापती आणि सदस्य बसवण्याच्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत.  

भाईंदर पश्चिम येथील भाजपा नगरसेविका वैशाली गजेंद्र रकवी ह्या पाय फ्रॅक्चर झाल्याने घरीच आहेत. स्वतः मेहता त्यांच्या घरी गेले आणि स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा देण्यास सांगितले . त्या अनुषंगाने शुक्रवारी महापौर दालनात रकवी यांच्या राजीनाम्याचे पत्र टाईप करण्यात आले. रकवी यांचे पती गजेंद्र यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडला आणि आयुक्तां कडे पत्र दिले गेले. 

नगरसेविकेच्या पररस्पर घरी जाऊन राजीनामा घेण्यात आल्याचा प्रकार स्थायी समिती सभापती अशोक तिवारी , जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे , नगरसेवक रवी व्यास , सुरेश खंडेलवाल आदींना कळताच त्यांनी संताप व्यक्त केला . नगरसेविका पाय फ्रॅक्चरमुळे घरी अंथरुणाला खिळलेली आहे व मुलीची नीटची परीक्षा आहे आणि अशा स्थितीत पक्षाला कोणतीच कल्पना न देता हे राजीनामा घेण्याच्या प्रकारचा निषेध केला व रकवी कुटुंबियांना धीर दिला. त्यानंतर आज शनिवारी सकाळी स्वतः वैशाली रकवी यांनी आयुक्त डॉ. विजय राठोड यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर संपर्क साधला आणि आपला राजीनामा स्वीकारू नये असे स्पष्ट केले. शिवाय रकवी यांनी लेखी पत्र सुद्धा आयुक्तांना पाठवले आहे. 

टॅग्स :BJPभाजपाMira Bhayanderमीरा-भाईंदर