लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: भाजपाचेठाणे महापालिकेतील गटनेते संजय वाघुले यांच्या रेल्वे स्थानकाजवळील कार्यालयाची दोन अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली. बुधवारी सायंकाळी ५.३० ते ६ वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला. नौपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हातात लाठया काठया घेऊन आलेल्या दोन अज्ञात समाजकंटकांनी त्यांच्या कार्यालयाच्या दरवाजाच्या काचा फोडल्या. त्यानंतर ते तिथून पसार झाले. हल्ला झाला त्यावेळी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले हे महापालिकेत होते. कार्यालयात कर्मचारी होते. सुदैवाने, त्यातील कोणालाही दुखापत झाली नाही. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाण्यातील भाजपचे नगरसेवक संजय वाघुलेंच्या कार्यालयाची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 21:51 IST
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : भाजपाचे ठाणे महापालिकेतील गटनेते संजय वाघुले यांच्या रेल्वे स्थानकाजवळील कार्यालयाची दोन अज्ञात व्यक्तींनी तोडफोड ...
ठाण्यातील भाजपचे नगरसेवक संजय वाघुलेंच्या कार्यालयाची तोडफोड
ठळक मुद्देनौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा