रस्त्यावर सांडलेल्या तेलावरून दुचाकी घसरली; एक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 22:11 IST2021-04-02T22:09:05+5:302021-04-02T22:11:16+5:30

माजीवडा उड्डाणपुलावर सांडलेल्या तेलावरून दुचाकी घसरून झालेल्या अपघातात राजकुमार सोहिंडा (६७) हे जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या अपघातामध्ये सोहिंडा यांच्या डोक्याला आणि पाठीला गंभीर दुखापत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

The bike slipped on the oil spilled on the road; One injured | रस्त्यावर सांडलेल्या तेलावरून दुचाकी घसरली; एक जखमी

खासगी रु ग्णालयात दाखल

ठळक मुद्देया अपघातामध्ये सोहिंडा यांच्या डोक्याला आणि पाठीला गंभीर दुखापत खासगी रु ग्णालयात दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: नाशिक- मुंबई राष्टÑीय महामार्गावरील ठाणे वाहिनीच्या माजीवडा उड्डाणपुलावर सांडलेल्या तेलावरून दुचाकी घसरून झालेल्या अपघातात राजकुमार सोहिंडा (६७) हे जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या अपघातामध्ये सोहिंडा यांच्या डोक्याला आणि पाठीला गंभीर दुखापत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सोहिंडा यांना उपचारासाठी एका खासगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माजीवडा उड्डाणपूलावर तेल पसरल्याची माहिती शुक्रवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाली होती. ही माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत सांडलेल्या तेलामुळे अन्य दुर्घटना घडू नये, यासाठी तातडीने पसरलेल्या तेलावर माती टाकली. या प्रकारामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ धीम्या गतीने सुरु होती. नंतर ती सुरळीत झाली.

Web Title: The bike slipped on the oil spilled on the road; One injured