खंडणी आणि दरोडयातील १२ वर्षांपासून फरारी बिहारच्या आरोपीला नाशिक येथून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 11:39 PM2021-01-01T23:39:10+5:302021-01-01T23:41:13+5:30

बिहार राज्यातील पूर्वीच्या चम्पारण्य परिसर असलेल्या जिल्हा मोतीहारी येथून खंडणीसह इतर गंभीर स्वरुपाच्या गुन्हयात गेल्या १२ वर्षांपासून पसार झालेल्या कमरुद्दीन उर्फ अमीरउद्दीन अन्सारी याला नाशिक येथून गुरुवारी ठाणे गुन्हे शाखेने अटक केली.

Bihar fugitive accused of ransom and robbery for 12 years arrested from Nashik | खंडणी आणि दरोडयातील १२ वर्षांपासून फरारी बिहारच्या आरोपीला नाशिक येथून अटक

नाशिकच्या अंबड पोलिसांची घेतली मदत

Next
ठळक मुद्दे ठाणे गुन्हे शाखेची कारवाईनाशिकच्या अंबड पोलिसांची घेतली मदत

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: बिहार राज्यातील पूर्वीच्या चम्पारण्य परिसर असलेल्या जिल्हा मोतीहारी येथून खंडणीसह इतर गंभीर स्वरुपाच्या गुन्हयात गेल्या १२ वर्षांपासून पसार झालेल्या कमरुद्दीन उर्फ अमीरउद्दीन अन्सारी याला नाशिक येथून गुरुवारी ठाणे गुन्हे शाखेने अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
बिहार राज्यातील मोतीहारी जिल्हयातील सरीसवा पोलीस ठाण्यात अन्सारी याच्याविरुद्ध खंडणी मागणे, स्फोटके बाळगणे, दरोडयाची तयारी करणे आदी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
त्याच्याविरुद्ध सुरु असलेल्या खटल्यांमध्ये तो न्यायालयात हजर राहत नव्हता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध न्यायालयाने जाहीरनामा काढून अटक वॉरंट काढले होते. त्याचा २००८ पासून बिहार पोलीस शोध घेत होते. तो मिळत नसल्यामुळे त्याच्याविरुद्धचे अनेक खटले सुनावणीसाठी प्रलंबित आहेत. त्यामुळे त्याच्या शोधासाठी बिहार पोलिसांनी ठाणे पोलिसांना विनंती केली होती. तो नाशिक येथील सिडको कॉलनीतील पंडित नगर येथे असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाला मिळाली. त्याआधारे नाशिकच्या अंबड पोलिसांच्या मदतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्सारी याला ३१ डिसेंबर २०२० रोजी या पथकाने ताब्यात घेतले. त्याला लवकरच बिहारच्या सरीसवा पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे.

Web Title: Bihar fugitive accused of ransom and robbery for 12 years arrested from Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.