शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

मोखाड्यातील बिवलपाडा पारतंत्र्यातच

By admin | Updated: December 28, 2015 02:00 IST

मोखाडापासून अवघ्या ३० ते ३५ किलोमीटर अंतरावरील बिवलपाड्यात आरोग्य, वीज, रस्ता आणि शिक्षण या मुलभूत अद्याप पोचलेल्या नाहीत.

वसई : मोखाडापासून अवघ्या ३० ते ३५ किलोमीटर अंतरावरील बिवलपाड्यात आरोग्य, वीज, रस्ता आणि शिक्षण या मुलभूत अद्याप पोचलेल्या नाहीत. त्यामुळे स्वातंत्र्यानंतरही येथील गावकरी हालाखीचे जिणे जगत आहेत. डोंगरदऱ्यांच्या कुशीत अति दुर्गम भागात बिवलपाडा वसला आहे. ३५ घरे आणि २०० च्या आसपास लोकवस्ती असलेला बिवलपाडा अद्यापही नागरी सोयीसुविधांपासून कोसो दूर आहे. दोन्ही बाजूने नदीचे पाणी आणि दुसऱ्या दोन बाजूला उंचच उंच डोंगर रांगा. एखादा रुग्ण अत्यवस्थ झाल्यास गावकरी चादरीची डोली बांधून खांद्यावर १० किलोमीटरची पायपीट करीत आसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेतात. रात्री-अपरात्री तर रुग्णाला नेणे फारच जिकीरीचे होऊन बसते. बिवलपाड्यापासून ६ किलोमीटर अंतरापर्यंत डांबरी रस्ता आहे. त्यानंतर गावात ये-जा करण्यासाठी रस्ता नाही. तीन वर्षांपूर्वी एमआरजीएस योजनेतून मातीचा भराव करून कच्चा रस्ता बनवला होता. पण, पावसाळ्यात तो वाहून गेल्याने गावकऱ्यांना जंगलातील पायवाटेने पायपीट करावी लागत आहे. गावात जिल्हा परिषदेची शाळा असून ३० ते ३५ विद्यार्थी आहेत. सध्या शाळेत चारच शिक्षक आहेत. ते नियमितपणे येत नसल्याने शाळा आठवड्यातून जेमतेम चार दिवस भरते. इतर दिवशी शिक्षक त्यांच्या वेळेनुसार शाळेत येत असल्याने शाळेला टाईमटेबलच नाही. शाळेची इमारत मोडकळीस आली आहे. ग्रामपंचायतीने तीन वर्षांपूर्वी वर्गखोलीचे सुुरु केलेले काम अपूर्णावस्थेत आहे. शाळेत एकंदर शैक्षणिक वातावरणाचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती कशी होणार हा खरा प्रश्न आहे. गावातली अंगणवाडीे एखाद्या घराच्या अंगणात अथवा झाडाखाली भरते, ती ही आठवड्यात तीन चार दिवसच. पावसाळ्यात तर ती भरतच नाही. शालेय आणि अंगणवाडी पोषण आहार धायोडीहून ६ किलोमीटरची पायपीट करीत डोक्यावरून आणावा लागतो. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी नियमित पोषण आहारापासूनही वंचित राहतात. अंगणवाडी इमारतीचे काम अद्याप अर्धवट आहे.