भिवंडीत तालुका पोलिसांची हुक्का पार्लरवर कारवाई; ३१ दुचाकी जप्त

By नितीन पंडित | Published: March 5, 2024 07:51 PM2024-03-05T19:51:23+5:302024-03-05T19:51:38+5:30

भिवंडी : शहर व ग्रामीण भागात अवैध हुक्का पार्लर मोठ्या संख्येने सुरु असून तालुका पोलिसांनी सोमवारी केलेल्या कारवाईत हुक्का ...

Bhiwandi taluka police action on hookah parlour 31 two-wheeler seized | भिवंडीत तालुका पोलिसांची हुक्का पार्लरवर कारवाई; ३१ दुचाकी जप्त

भिवंडीत तालुका पोलिसांची हुक्का पार्लरवर कारवाई; ३१ दुचाकी जप्त

भिवंडी: शहर व ग्रामीण भागात अवैध हुक्का पार्लर मोठ्या संख्येने सुरु असून तालुका पोलिसांनी सोमवारी केलेल्या कारवाईत हुक्का पिण्यासाठी आलेल्या ३१ जणांच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. पोगाव गावात बीबीए चायनीज कॉर्नर या ठिकाणी अनधिकृतपणे हुक्का पार्लर सुरू होता. याबाबतची माहिती नवनियुक्त पोलीस उपअधीक्षक राहुल झाल्टे यांना मिळाल्यानंतर त्यांच्या निर्देशानुसार भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासो एडके यांनी पोलीस पथकासह सोमवारी रात्री या हुक्का पार्लरवर कारवाई केली.

हुक्का पार्लर चालक अली शफिक पटेल रा. अर्जुनली पडघा व त्याचे दोन नोकर व ३१ ग्राहकांवर गुन्हा दाखल करीत या ग्राहकांच्या ३१ दुचाकी जप्त करून पोलिस ठाण्यात आणल्या आहेत. पोलिसांनी कारवाई करताना थेट दुचाकी जप्त करण्याची कारवाई केल्याने हुक्का पार्लर चालक तसेच हुक्का पिण्यासाठी जाणारे यांच्यामध्ये खळबळ माजली आहे.

Web Title: Bhiwandi taluka police action on hookah parlour 31 two-wheeler seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.