शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

तीन बारवर भिवंडी पोलिसांचे छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 00:35 IST

२४ बारबाला सापडल्या : १७ बार कर्मचारी अटकेत, चालक-मालकांचा शोध सुरू

मीरा रोड : काशिमीरा व मीरारोड पोलीस ठाण्यात बेधडकपणे आॅर्केस्ट्रा बारच्या आड चालणाऱ्या अश्लिल नृत्य, बारबालांची रेलचेल भिवंडी ग्रामीण आणि पडघा पोलिसांनी छापे टाकून उघड केली. तीन बारवरील कारवाईत २४ बारबाला सापडल्या आहेत. याशिवाय १७ बार कर्मचाऱ्यांना अटक करुन ६ चालक-मालकांचा शोध सुरू आहे. ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजीराव राठोड यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली असून यामुळे काशिमीरा, मीरारोड पोलीस ठाण्यांसह अनैतिक मानवी वाहतूक शाखेचे पोलीस करतात काय, असा सवाल केला जाऊ लागला आहे.

मीरा भार्इंदरमधील काशिमीरा, मीरारोड, नवघर व नयानगर पोलीस ठाणे हद्दीत मोठ्या संख्येने आॅर्केस्ट्रा बार असून बहुतांश बारलगतच लॉज आहेत. आॅर्केस्ट्रा बारच्या आड सर्रास अश्लील नृत्य व वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याचे सर्वश्रुत असून लॉजमधूनदेखील वेश्या व्यवसाय चालवला जातोय. कायद्याने बंदी असताना राजरोस चालणाºया या अनैतिक प्रकारांबद्दल मोठ्या प्रमाणात तक्रारी असूनदेखील पोलिसांकडून ठोस कारवाईच होत नाही. दुसरीकडे बार-लॉजची बेकायदा बांधकामे पालिका तोडत नाही. गुन्हे दाखल असूनही जिल्हा प्रशासन व उत्पादन शुल्क विभाग सर्रास परवाने देत सुटले आहेत. त्यामुळे मीरा भार्इंदर म्हणजे आॅर्केस्ट्रा बार व लॉजचे, तसेच अनैतिक व्यवसायाचे शहर म्हणून ओळखले जातेय.

शहरातील बारमधून मोठ्या संख्येने बारबाला अश्लील नाचगाणे व चाळे करत असल्याच्या तक्रारी ठाणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. शिवाजीराव राठोड यांच्यासह वरिष्ठांपर्यंत होत होत्या; परंतु स्थानिक पोलिसांकडून सोयीस्कर डोेळेझाक केली जात असल्याने ठोस आणि सातत्याने कारवाई केली जात नसल्याचे लक्षात आल्यावर राठोड यांनी पडघा व भिवंडी पोलिसांना मीरा भार्इंदरमधील बारवर धाडी टाकण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने बुधवारी रात्री भिवंडी ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राहुल अतिग्रेसह श्रीपत मोरे, आनंदा पाटील, ईश्वर पाटील या पोलीस कर्मचाºयांनी काशिमीरा पोलिसांना सोबत घेऊन महामार्गावरील पांडुरंग वाडी येथे असलेल्या नाईटसिटी आणि बॉसी या आॅर्केस्ट्रा बारवर धाडी टाकल्या. नाईट सिटीमध्ये नऊ बारबाला सापडल्या. व्यवस्थापक रघू शेट्टीसह दोघा वेटरना अटक करण्यात आली. येथे ३६०० रुपयांची रोख जप्त करण्यात आली. बॉसी बारमधून ६ बारबाला सापडल्या. येथूनदेखील व्यवस्थापकासह दोन वेटरना अटक केली. ६ हजार रुपये रोखही जप्त केली. या दोन्ही बारमध्ये बारबाला अर्धवट कपडे घालून अश्लील चाळे करत होत्या.अश्लील नृत्य करत होत्यामीरारोडच्या शीतलनगरमधील बिंदिया आॅर्केस्ट्रा बारवर पडघा पोलीस ठाण्याचे विलास निमसे, सुभाष पादिर, मोहन भोईर, प्रवीण चव्हाण या पोलिसांनी उपनिरीक्षक शिरीष चौधरी यांच्यासह धाड टाकली.बारमध्ये तब्बल नऊ बारबाला सापडल्या. त्या अश्लील नृत्य करत होत्या. १४ ग्राहकांचीदेखील पोलिसांनी नोंद घेतली. व्यवस्थापक प्रदीप शेट्टी व १० वेटरना अटक करण्यात आली असून, पाच हजार रुपये रोख जप्त करण्यात आले.अश्लील नृत्यावर प्रतिबंध घालणे तसेच महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करणे अधिनियम २०१६ नुसार मीरारोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या तिन्ही बारच्या चालक व मालकांनादेखील आरोपी करण्यात आले आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीMumbaiमुंबईPoliceपोलिस