भिवंडीत अल्पवयीन चिमुरडी सोबत कुकर्म करून हत्या; नराधमास पोलिसांनी केली अटक
By नितीन पंडित | Updated: July 5, 2024 15:18 IST2024-07-05T15:18:22+5:302024-07-05T15:18:45+5:30
भिवंडीत चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिचा गळा आवळून आरोपीने हत्या केली होती

भिवंडीत अल्पवयीन चिमुरडी सोबत कुकर्म करून हत्या; नराधमास पोलिसांनी केली अटक
भिवंडी: शांतीनगर भागातील गोविंद नगर परिसरात एका इमारतीमध्ये नऊ वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिचा गळा आवळून हत्या करणाऱ्या नराधम आरोपीस भिवंडी गुन्हे शाखेने रात्री उशिरा अटक केली आहे. त्यानंतर आरोपीचा ताबा शांतीनगर पोलिसांकडे सुपूर्द केला आहे.
अभय यादव असे या नराधम कुकर्म करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.गुरुवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास कामावरून घरी परतलेल्या कुटुंबियांना आपली नऊ वर्षाची मुलगी घरात आढळून न आल्याने तिचा परिसरात शोध घेत असता त्याच इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर एका बाहेरून कडी लावलेल्या खोलीत तिचा गळा होऊन हत्या केलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.या घटने नंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.शांतीनगर पोलिसांसोबतच भिवंडी गुन्हे शाखेचे पोलीस पथकांनी परिसरातील नागरिकांकडून माहिती घेत आरोपीचा शोध सुरू केला असताना रात्री उशिरा आरोपी हा एका ठिकाणी लपून बसलेल्या अवस्थेत गुन्हे शाखेला आढळून आला.
गुन्हे शाखेने आरोपीस पहाटे उशिरा शांतीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.शांतीनगर पोलिसांनी आरोपी अभय यादव याच्या विरोधात बलात्कार व हत्या या कायद्याने गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली आहे.