परतीच्या पावसाने भिवंडीला झोडपले, पाणी साचल्याने वाहनांना वाहतुकीस अडथळा
By नितीन पंडित | Updated: October 1, 2022 16:37 IST2022-10-01T16:37:17+5:302022-10-01T16:37:44+5:30
दीड तासांच्या मुसळधार पावसात रस्ते झाले जलमय

परतीच्या पावसाने भिवंडीला झोडपले, पाणी साचल्याने वाहनांना वाहतुकीस अडथळा
नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क- भिवंडी: सप्टेंबर महिन्यात पावसाने अनेकांची दाणादाण उडवली असताना ऑक्टोंबर महिन्यापासून पावसाचा परतीचा प्रवास सुरू होईल असा अंदाज वर्तवला जात होता. हा अंदाज खरे ठरवीत एक आक्टोंबर रोजी परतीचा पावसाने भिवंडी शहरात दमदार हजेरी लावली. दुपारी दीड तास पडलेल्या मुसळधार पावसामध्ये शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले होते.
भिवंडी कल्याण रस्त्यावरील राजनोली नाका, गोवे नाका येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.याचा फटका एका सीएनजी पंपावरील वाहनांना सुद्धा बसला.तर शहरातील तीन बत्ती भाजी मार्केट, अंजुरफाटा , कल्याण नाका आदी परिसरात देखील पाणी साचल्याने प्रवाशांची दैना उडालेली पाहायला मिळाली.