भिवंडीत डाईंग कंपनीला भीषण आग; आगीचे कारण अद्याप अस्पष्ट 

By नितीन पंडित | Updated: August 1, 2023 19:39 IST2023-08-01T19:39:25+5:302023-08-01T19:39:38+5:30

ही आग इतकी भयानक होती की आगीचे लोळ सर्वदूर पसरले होते. 

Bhiwandi dyeing company caught fire cause of the fire is still unclear | भिवंडीत डाईंग कंपनीला भीषण आग; आगीचे कारण अद्याप अस्पष्ट 

भिवंडीत डाईंग कंपनीला भीषण आग; आगीचे कारण अद्याप अस्पष्ट 

भिवंडी: कपड्यावर प्रक्रिया करणाऱ्या डाइंग कंपनीला भीषण आग लावल्याची घटना मंगळवारी सायंकाळी धामणकर नाका अजंठा कंपाउंड परिसरात घडली आहे. ही आग इतकी भयानक होती की आगीचे लोळ सर्वदूर पसरले होते. 

अजंठा कंपाऊंड या नागरी वस्तीमध्ये ही महाकाल डाईंग असून अत्यंत दाटीवाटीच्या परिसरात असल्याने घटनास्थळी दाखल झालेला अग्निशामक दलाला आग विझविण्या साठी मोठी अडचण निर्माण झाली होती.आगीत कंपनी मधील यंत्रसामुग्री, कच्चा कपडा, रंग प्रकियेचे रसायन हे जळून खाक झाले असून आगीच्या धुराचे लोट उंच आकाशात पसरत होते. घटनास्थळी महानगरपालिकेच्या तीन अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल होत आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले असून आग आटोक्यात येण्यास किमान चार तासाचा अवधी लागण्याची शक्यता अग्निशमन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. आगीचे कारण अजून स्पष्ट झाले नाही. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

Web Title: Bhiwandi dyeing company caught fire cause of the fire is still unclear