भिवंडी: ब्रेकअप केल्याचा राग, भावाचं अपहरण! 22 वर्षीय एक्स गर्लफ्रेंडवर दोन वेळा सामूहिक बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 12:59 IST2025-02-23T12:57:38+5:302025-02-23T12:59:16+5:30
भिवंडीत पाच मित्रासह एक्स बॉयफ्रेंडने सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. ब्रेकअप केल्याच्या रागातून त्याने कट रचला आणि मित्रांसह तरुणीवर एकाच रात्री दोन वेळा सामूहिक बलात्कार केला.

भिवंडी: ब्रेकअप केल्याचा राग, भावाचं अपहरण! 22 वर्षीय एक्स गर्लफ्रेंडवर दोन वेळा सामूहिक बलात्कार
Bhiwandi Crime: एका २२ वर्षीय तरुणीवर एकाच रात्री दोन वेळा सामूहिक बलात्कार केल्याच्या घटनेने भिवंडी हादरली! पाच मित्रांच्या मदतीने पीडित तरुणीच्या भावाचे अपहरण केले. त्यानंतर तरुणीला मध्यरात्री निर्जनस्थळी बोलावून घेतले. त्यानंतर तिला दोन वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन चौघांनी सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणातील मुख्य आरोपी तरुणीचा एक्स बॉयफ्रेंडचं असल्याचे समोर आले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भिवंडीतील शांती नगर पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात अपहरण आणि सामूहिक बलात्कार प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींपैकी चार जणांनी सामूहिक बलात्कार केला, तर दोघांनी मदत केल्याचे आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला अटक केली आहे.
ब्रेकअपचा राग, धडा शिकवण्यासाठी रचला बलात्काराचा कट
पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींचा शोध सुरू केला. प्राथमिक तपासातून असे समोर आले की, पीडित तरुणी आणि मुख्य आरोपी हे एकमेकांच्या रिलेशनमध्ये होते. दोघेही एकाच गावातील आहेत. मागील काही वर्षांपासून ते रिलेशनमध्ये होते.
चार महिन्यांपूर्वी दोघांचं ब्रेकअप झाले होते. त्यानंतर तरुणी दुसऱ्या तरुणांसोबत रिलेशनशिपमध्ये गेली. हे कळल्यानंतर एक्स बॉयफ्रेंडला राग आला. त्यातूनच तिला धडा शिकवण्यासाठी आरोपीने तिच्यावर अत्याचाराचा कट रचला.
भावाचे अपहरण, मध्यरात्री तरुणीला कॉल
गुरुवारी रात्री (२० फेब्रुवारी) पीडितेच्या भावाचे तिच्या एक्स बॉयफ्रेंडने पाच मित्रांच्या मदतीने अपहरण केले. त्यानंतर त्याला पीडितेला कॉल करायला सांगितले. तिला भावाचे १५ मिसकॉल आले होते.
मध्यरात्री १.१५ वाजता तिला जाग आली. तिने मोबाइलमधील मिसकॉल बघून भावाकडे चौकशी करण्यासाठी फोन केला. त्यावेळी भावाने, 'माझी तब्येत बरी नाही, तू बागे फिरदौस येथे ये' असे सांगितले. त्यामुळे पीडित तरुणी ओळखीच्या रिक्षाचालकासोबत बागे फिरदौस येथे आली.
तेथे दबा धरून बसलेले सदरे ऊर्फ मोहम्मद साईद आलम, पाशा, लड्डू, गोलू व इतर दोन जण (सर्व रा. फातमानगर) यांनी पीडितेसह तिचा भाऊ व रिक्षाचालकास मारहाण केली. त्यानंतर जबरदस्तीने रिक्षात बसवून नागाव येथील जुनी नवजीवन इंग्रजी शाळेच्या पाठीमागे असलेल्या झाडाझुडपांत पीडितेला नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
आरोपी पीडितेला घेऊन दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेले. आरोपींनी तिला पुन्हा फातमानगर येथे घेऊन गेले. तेथे उभ्या असलेल्या एका पिकअप बोलेरो गाडीत त्यांनी पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पीडित तरुणी, तिचा भाऊ आणि रिक्षाचालकाला धमकावून पसार झाले. या घटनेनंतर तरुणीने पोलीस ठाण्यात जाऊन सगळी आपबिती सांगितली. तक्रारीनंतर हा सगळा प्रकार समोर आला.