नाताळच्या रोषणाईने उजळले भाईंदर व उत्तन   

By धीरज परब | Updated: December 25, 2024 19:24 IST2024-12-25T19:21:32+5:302024-12-25T19:24:57+5:30

Christmas News: नाताळ सणाच्या आनंदी आणि उत्साही वातावरणात उत्तन व भाईंदर येथील आकर्षक विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाला आहे . लोकांना देखील आकर्षक रोषणाईचे आकर्षण वाटत असून काही ठिकाणी तर सेल्फी पॉईंट उभारले आहेत . 

Bhayander and Uttan lit up with Christmas lights | नाताळच्या रोषणाईने उजळले भाईंदर व उत्तन   

नाताळच्या रोषणाईने उजळले भाईंदर व उत्तन   

मीरारोड - नाताळ सणाच्या आनंदी आणि उत्साही वातावरणात उत्तन व भाईंदर येथील आकर्षक विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाला आहे . लोकांना देखील आकर्षक रोषणाईचे आकर्षण वाटत असून काही ठिकाणी तर सेल्फी पॉईंट उभारले आहेत . 

भाईंदरचे जुने गाव आणि डोंगरी , उत्तन , पाली , चौक , तारोडी ह्या गावात ख्रिस्ती बांधवांची संख्या मोठी आहे . त्यामुळे ह्या भागात नाताळचा उत्साह मोठा आहे . ह्या भागातील विविध धार्मिक स्थळांना विद्युत रोषणाई केली गेली आहे . २४ डिसेम्बरच्या मध्यरात्री चर्च मध्ये प्रार्थनेसाठी मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती . प्रार्थना झाल्यावर एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या . 

भाईंदर गावात तसेच उत्तन , डोंगरी आदी गावां मध्ये घरां वर तसेच गल्ली , परिसरात विद्युत रोषणाई केली गेली आहे . कंदील लावले आहेत . नाताळ गोठे साकारले गेले आहेत . विविध आकाराच्या आणि प्रकारच्या विद्युत रोषणाई मुळे परिसर उजळून निघाला आहेच शिवाय त्याचे आकर्षण देखील आहे . काही ठिकाणी तर फोटो काढण्यासाठी सेल्फी पॉईंट साकारले गेले आहेत . लोकं देखील अश्या सेल्फी पॉईंट तसेच आकर्षक रोषणाई केलेल्या घरांच्या बाहेर उभे राहून फोटो काढत आहेत . 

सांताक्लॉज चे देखावे केले आहेत . लोकां मध्ये आनंद आणि उत्साह असून केवळ ख्रिस्ती बांधवच नव्हे तर हिंदू , मुस्लिम आदी धर्मीय देखील नाताळच्या आनंदात सहभागी झालेले दिसतात तसेच एकमेकांना शुभेच्छा देत असतात . दिवाळी मध्ये जसा फराळ केला जातो तसाच नाताळ मध्ये ख्रिस्ती बांधव देखील विविध खाद्यपदार्थ बनवतात . एकमेकांच्या घरी नाताळच्या शुभेच्छा देण्यासह फराळ देखील आवडीने केला जातो . विशेषतः लहान मुलां मध्ये नाताळचे आकर्षण जास्त दिसते . 

Web Title: Bhayander and Uttan lit up with Christmas lights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.