भरदुपारी दुचाकीस्वाराची सोन्याची चेन लांबवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:28 IST2021-06-25T04:28:03+5:302021-06-25T04:28:03+5:30

भिवंडी : भिवंडी-पारोळ महामार्गावर रायपाडा येथे झिंदाबाद किराणा दुकानाच्या बाजूने पारोळच्या दिशेने जाणाऱ्या बाळाराम राघो शेळके (४५, मु. माजीवडा) ...

Bhardupari lengthened the two-wheeler's gold chain | भरदुपारी दुचाकीस्वाराची सोन्याची चेन लांबवली

भरदुपारी दुचाकीस्वाराची सोन्याची चेन लांबवली

भिवंडी : भिवंडी-पारोळ महामार्गावर रायपाडा येथे झिंदाबाद किराणा दुकानाच्या बाजूने पारोळच्या दिशेने जाणाऱ्या बाळाराम राघो शेळके (४५, मु. माजीवडा) या दुचाकीस्वाराच्या गळ्यातील सोन्याची चेन शिताफीने चोरून चोरट्यांनी बुधवारी दुपारी पोबारा केला. शेळके यांनी त्यांची दोन तोळे वजनाची सुमारे ६२ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली.

शेळके हे किराणा माल खरेदी करण्यासाठी भिवंडी येथे गेले होते. घरी परत येत असताना रायपाडा येथे दोन अनोळखी व्यक्ती रस्त्यात उभ्या होत्या. त्या व्यक्तींनी शेळके यांना थांबविले व आपण पोलीस असून, मंगळवारी रात्री याच ठिकाणी परदेशी साहेबांचा दागिन्यांमुळे खून झाल्याच्या घटनेचा तपास सुरू आहे. पुढे पोलीस तपासणी करीत असल्याने तुम्ही तुमच्या गळ्यातील सोन्याची चेन काढून ठेवा, असे सांगितले. त्या दोन अनोळखी व्यक्तींनी शेळके यांच्या गळ्यातील सोन्याची चेन काढून ती कागदाच्या पुडीत बांधून त्यांच्या हातात दिली. शेळके यांना थोडे पुढे गेल्यावर संशय आल्याने त्यांनी दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी करून पुडी सोडून पाहिली असता त्यामध्ये माती व खडे सापडले. भिवंडी तालुका पोलीस स्टेशनमध्ये अनोळखी चोरांविरुद्ध गुन्हा नोंदण्यात आला आहे.

.........

वाचली

Web Title: Bhardupari lengthened the two-wheeler's gold chain