शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

भंडाऱ्यासाठीचे धान्य कुपोषणग्रस्तांना

By admin | Updated: September 12, 2016 03:06 IST

अंबरनाथमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे भंडारा जमा करून भाविकांना महाप्रसादाचा लाभ देतात. मात्र यंदा शहरातील नागरिकांना महाप्रसाद देण्याऐवजी याच भंडारा

अंबरनाथ : अंबरनाथमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे भंडारा जमा करून भाविकांना महाप्रसादाचा लाभ देतात. मात्र यंदा शहरातील नागरिकांना महाप्रसाद देण्याऐवजी याच भंडारा स्वरुपात संकलीत होणारे धान्य कुपोषणग्रस्तांना देण्याची संकल्पना शिवसेनेच्यावतीने राबविण्यात येत आहे.या उपक्रमात शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी केले आहे. यापूर्वी ठाणे जिल्ह्याचा भाग राहिलेल्या पालघर जिल्ह्यातील कुपोषणग्रस्त भागांना हे धान्य पाठविण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्यातील आदिवासी बालकांचे कुपोषणामुळे मृत्यू होतात. पालघर जिल्ह्यात जुलै २०१६ पर्यंत ७ हजार ३२० बालके कुपोषित असल्याची माहिती सरकारी अहवालातून उघड झालेली आहे. तर मोखाडयात जुलै महिन्यात १२ बालकांचा मृत्यू झाला आहे. शेजारील तालुक्यात भूकेपोटी मृत्यू होत असताना मानवी जीव वाचवणे महत्वाचे आहे की नाही, असा प्रश्न शिवसेनेनी केला आहे. एकीकडे लहान बालकांचे कुपोषणाने मृत्यू होत असताना दुसरीकडे गणेशोत्सवाच्या नावाने अनेक मंडळे भंडारा देऊन मंडळाचा गौरव वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत ही विसंगती आहे. याच सार्वजनिक मंडळांनी भंडारासाठी एकत्रित होणारे धान्य गोळा करुन ते कुपोषणग्रस्त भागांना वाटप केल्यास त्या बालकांना चांगला आहार मिळण्यास मदत होईल. अंबरनाथ शहरातल्या सुमारे ५० ते ६० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फेअन्नदानाचा कार्यक्र म आयोजित केला जातो. यासाठी हजारो किलो धान्याचा वापर केला जातो. आम्ही या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पत्रक पाठविले असून त्यांनी महाभंडाऱ्याचा कार्यक्र म रद्द करून त्यासाठी लागणारे सर्व धान्य शिवसेना शाखेकडे सुपूर्द करावे, अशी विनंती संबंधित पदाधिकाऱ्यांना केली आहे, अशी माहिती वाळेकर यांनी दिली. १० दिवसांच्या गणेश विसर्जनानंतर जमा होणारे शेकडो किलो धान्य पालघर जिल्ह्यात पाठवणार आहोत, असेही वाळेकर यांनी सांगितले. शहरातील उद्योगपती, कारखानदार, व्यापारी वर्ग, सामाजिक संस्था यांच्यासह शहरातील नागरिकांना देखील कुपोषित बालकांना अन्नदान अथवा अन्य स्वरुपात मदत शिवसेना अंबरनाथ शहर शाखेत आणून द्यावी असे आवाहन सेनेच्या वतीने करण्यात आले आहे.