शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

भाईंदरमध्ये मालमत्ताकराची केवळ ४६ टक्केच वसुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 02:29 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेने २०१८-१९ च्या अंदाजपत्रकात मालमत्ताकरापोटी २०३ कोटींचे उद्दिष्ट ठेवले. मात्र, १० महिन्यांत या उद्दिष्टांपैकी ४६ टक्केच वसुली झाल्याने पालिकेचा आर्थिक गाडा दिवाळखोरीच्या गर्तेत सापडण्याची चिन्हे आहेत.

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेने २०१८-१९ च्या अंदाजपत्रकात मालमत्ताकरापोटी २०३ कोटींचे उद्दिष्ट ठेवले. मात्र, १० महिन्यांत या उद्दिष्टांपैकी ४६ टक्केच वसुली झाल्याने पालिकेचा आर्थिक गाडा दिवाळखोरीच्या गर्तेत सापडण्याची चिन्हे आहेत. उर्वरित ५४ टक्के करवसुलीसाठी पालिकेकडे केवळ दोन महिन्यांचाच अवधी शिल्लक असला, तरी त्यासाठी पुरेसे मनुष्यबळही उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे.शहरातील अनेक नवीन बांधकामे अद्याप मालमत्ताकराच्या कक्षेत आणलेली नाहीत. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. परिणामी, रोज वसूल होणाऱ्या कराची आकडेवारी लेखा विभागाला सादर करून निधी तरतुदीची कामे पार पाडावी लागत आहेत. कंत्राटदारांना कामांची बिले वेळेवर दिली जात नसल्याने कंत्राटदार कामे करण्यास अनुत्सुक आहेत.पालिकेकडे पुरेसा निधी नसल्याने राखीव निधी वापराचा प्रयत्न झाला होता. परंतु, त्याला वेळीच ब्रेक लावण्यात आला. यंदाच्या आर्थिक वर्षात प्रशासनाने कर विभागाला मालमत्ताकरापोटी २०३ कोटी वसुलीचे उद्दिष्ट दिले. पण, त्याची वेळेत वसुली न झाल्याने पालिकेच्या आर्थिक ताळेबंदीवर संकटाचे वलय निर्माण होण्याची शक्यता आहे.शहरात सुमारे तीन लाख ४१ हजार मालमत्ता आहेत. ज्या मालमत्ता बेकायदा आहेत, त्या मालमत्तांपोटी पालिका दंडात्मक कराची वसुली करते. परंतु, राज्य सरकारने गेल्यावर्षी काढलेल्या आदेशानुसार ६०० चौरस फुटांपर्यंतच्या बेकायदा निवासी सदनिकांवरील १०० टक्के दंड पालिकेकडून माफ केला जात आहे. तर, ६०० ते १००० चौरस फुटांपर्यंतच्या बेकायदा निवासी सदनिकांकडून १०० ऐवजी ५० टक्केच दंडवसुलीला मान्यता देण्यात आल्याने पालिकेला १००० चौरस फुटांपर्यंतच्या बेकायदा बांधकामांपोटी मिळणारे ७५ टक्के पालिकेने चालू वर्षात कर विभागाला २०३ कोटी वसुलीचे उद्दिष्ट दिले असले, तरी १० महिन्यांत ९५ कोटींचीच वसुली झाली आहे. त्यामुळे पालिकेला उर्वरित ५४ टक्के म्हणजेच १०८ कोटींच्या वसुलीसाठी दोन महिन्यांत युद्धपातळीवर प्रयत्न करावे लागणार आहेत.कर विभागाचे एकूण ३७ पैकी १९ लिपिक व दोन शिपाई लोकसभा निवडणुकीच्या कामाला जुंपण्यात आले आहेत. तर, एकूण ८८ झोनपैकी तीन झोनमध्ये लिपिकच नाही.मालमत्ताकराच्या थकीत वसुलीसाठी कर विभागात पुरेसे मनुष्यबळ नसले, तरी इतर विभागांतील कर्मचाºयांची करवसुलीसाठी तात्पुरती नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी विविध पथके तयार करून करवसुलीसाठी प्रसंगी पाणीपुरवठा खंडित करणे तसेच इमारतीमधील कचरा न उचलणे आदी गंभीर पावले उचलावी लागणार आहेत.- दादासाहेब खेत्रे, करनिर्धारक व संकलक

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर