सावधान... ऑनलाईन लग्न जुळवताय !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 17:13 IST2018-07-05T17:03:55+5:302018-07-05T17:13:28+5:30

३० वर्षीय तरुणीला ठगाने घातला लाखोंचा गंडा; फसवणूक, बलात्काराचा गुन्हा दाखल

Beware ... online wedding match! | सावधान... ऑनलाईन लग्न जुळवताय !

सावधान... ऑनलाईन लग्न जुळवताय !

ठाणे - लग्न जुळवून देणाऱ्या वेबसाइट्सवरून ३० वर्षीय तरुणीशी जवळीक साधून तिला लाखोंचा गंडा घातल्याची घटना ठाण्यात घडली आहे. या प्रकरणातील आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक अत्याचारही केला. मात्र, त्याचे अगोदरच लग्न झाल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. आरोपी प्रमोद काकडे (३५) अद्याप फरार आहे.

घोडबंदर रोड येथे राहणाऱ्या ३० वर्षीय पीडित तरुणीची ऑनलाईन लग्न जुळणाऱ्या भारत मेट्रोमोनी या वेबसाईटवरून कल्याण येथे राहत असलेल्या प्रमोद काकडेसोबत ओळख झाली. त्याने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. तसेच तिच्याकडून दोन लाख ६३ हजारांची रक्कम उकळून ६८ हजार रुपयांचा मोबाईलही त्याने घेतला. काही दिवसांनी त्याचे दुसरे लग्न झाल्याचे तरुणीच्या लक्षात आले. त्यामुळे प्रमोदचे बिंग फुटले. मात्र, त्यानंतर प्रमोदने तिला फोनवरून याबाबत कोणाकडे वाच्यता करू नको, अशी धमकी दिली. याप्रकरणी पीडित तरुणीने प्रमोदविरोधात फसवणूक, बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. 

Web Title: Beware ... online wedding match!