ठाण्यात लाडका भाऊ कोण हे लाडक्या बहिणीच ठरवणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 11:01 IST2025-11-15T11:00:12+5:302025-11-15T11:01:48+5:30
TMC Election : ठाणे महापालिका निवडणुकीत २०१७ ची लोकसंख्या विचारात घेतली असली तरी मतदारांची संख्या जुलै २०२५ पर्यतची असल्याने ठाण्यात चार लाख २१ हजार २५६ मतदार वाढले आहेत.

ठाण्यात लाडका भाऊ कोण हे लाडक्या बहिणीच ठरवणार
ठाणे - ठाणे महापालिका निवडणुकीत २०१७ ची लोकसंख्या विचारात घेतली असली तरी मतदारांची संख्या जुलै २०२५ पर्यतची असल्याने ठाण्यात चार लाख २१ हजार २५६ मतदार वाढले आहेत. त्यातही महिला मतदारांची संख्या दोन लाख २४ हजार ७४३ ने वाढली आहे. त्यामुळे निवडणुकीत 'लाडक्या बहिणींची' मते निर्णायक ठरणार आहेत.
चार सदस्यीय पॅनल पद्धतीने होणाऱ्या पालिका निवडणुकीत २०११ च्या जनगणनेनुसार ठाण्याची लोकसंख्या १८,४१, ४८८ होती. आता ती २५ लाखांच्या पुढे गेल्याने मतदार वाढले. २०१७ च्या निवडणुकीत १२, २८, ६०६ इतकी मतदारांची संख्या होती. आता ही संख्या ४, २१, २५६ ने वाढली आहे. आता संख्या ४, २१, २५६ ने वाढली आहे. आता एकूण मतदारांची संख्या ही १६ लाख ४९ हजार ८६२ एवढी झाली आहे.
महिला मतदारांच्या संख्येत वाढ
२०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत पुरुष मतदारांची संख्या सहा लाख ६७ हजार ५०४ एवढी होती. आता ही संख्या आठ लाख ६३ हजार ८७४ झाली आहे.
पुरुष मतदारांची संख्या एक लाख ९६ हजार ३७० ने वाढली तर महिला मतदारांची संख्या २०१७मध्ये पाच लाख ६१ हजार ०८७ एवढी होती.
आता ही संख्या सात लाख ८५ हजार ८३० एवढी झाली. महिला मतदारांची संख्या दोन लाख २४ हजार ७४३ ने वाढली आहे.
