बार आणि रेस्टांरंट सुरू झाले, मग मंदिर आणि जिमला सरकारचा अडसर का? मनसेचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 17:46 IST2020-10-07T17:46:30+5:302020-10-07T17:46:40+5:30
Raju Patil News : तिरुपतीसारखे मंदिर सोशल डिस्टंसिंग पाळून सुरू आहे. बार आणि रेस्टाँरंट खुले केले आहेत. मंदिर आणि जिम सरकारने असे का धोरण घेत आहे, मनसे आमदार राजू पाटील यांचा सवाल

बार आणि रेस्टांरंट सुरू झाले, मग मंदिर आणि जिमला सरकारचा अडसर का? मनसेचा सवाल
कल्याण - जिम चालक व ट्रेनर हे ८० टक्के मराठी मुले आहेत. तिरुपतीसारखे मंदिर सोशल डिस्टंसिंग पाळून सुरू आहे. बार आणि रेस्टाँरंट खुले केले आहेत. मंदिर आणि जिम सरकारने असे का धोरण घेत आहे. मंदिर हा आस्थेचा विषय आहेच. त्याच्या भोवती फिरणारी आर्थिक व्यवस्था असते. अनेक मराठी मुलांनी जीम व्यवसाय सुरु केले आहेत. सहा महिन्यांचे भाडे थकले आहे. ते कुठून देणार. हे लोक राज ठाकरे यांच्याकडे हा प्रश्न घेऊन गेले, म्हणून सरकार जीम व मंदिरे खुली करण्याच्या निर्णय घेण्यात दिरंगाई करीत असल्याचा आरोप मनसे आमदार राजू पाटील यांनी केला आहे. तसेच या सरकारच्या विरोधात डंबेल्स घेऊन मोर्चा काढा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे आवाहन जीम ट्रेनर चालकांना केले आहे.
हॉटेल,रेस्टॉरंट,बार सुरू झाले मग जिम सुरू करायला कोणता विज्ञान आडवा येत आहे ? बहुतांश तरूणांनी पोटापाण्यासाठी चालू केलेला हा व्यवसाय आज त्यांनाच थकलेल्या भाड्यापोटी गिळायला उठला आहे याचे तरी भान ठेवा.@OfficeofUT@CMOMaharashtra
— Raju Patil (@rajupatilmanase) October 6, 2020