शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

बाधितांची उच्च न्यायालयात धाव

By admin | Updated: October 12, 2016 04:17 IST

स्थानिकांच्या विरोधामुळे वादग्रस्त ठरलेल्या केळकर रस्त्याच्या रुंदीकरणप्रकरणी गुरुवारी आयुक्त ई. रवींद्रन यांच्याबरोबर रुंदीकरणात बाधित होणारे रहिवासी

डोंबिवली : स्थानिकांच्या विरोधामुळे वादग्रस्त ठरलेल्या केळकर रस्त्याच्या रुंदीकरणप्रकरणी गुरुवारी आयुक्त ई. रवींद्रन यांच्याबरोबर रुंदीकरणात बाधित होणारे रहिवासी, व्यापाऱ्यांची बैठक झाली. बाधित होणाऱ्या २७ इमारतींपैकी काही इमारतींमधील रहिवाशांनी कारवाईला स्थगिती मिळण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यातील दोन इमारतींच्या बाबतीत परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश न्यायालयाने केडीएमसीला दिले आहेत. यासंदर्भातील पुढील सुनावणी १९ आॅक्टोबरला होणार असून अन्य १५ इमारतींमधील रहिवाशांनीही स्थगितीसाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. केळकर मार्ग आणि दीनदयाळ रोड रुंदीकरणाचे काम केडीएमसीच्या वतीने लवकरच हाती घेतले जाणार आहे. परंतु, यात बाधित होणाऱ्यांनी रुंदीकरणाला विरोध दर्शवल्याने तूर्तास ही मोहीम पुढे ढकलली आहे. या मार्गाचे दोनवेळा रुंदीकरण झाले आहे. पुन्हा तिसऱ्यांदा रुंदीकरणाचा घाट कशाला घातला, असा सवाल संबंधितांनी केला आहे. यावर, बाधित होणारे रहिवासी, व्यापारी आणि आयुक्तांची महापालिका मुख्यालयात विशेष बैठक झाली. मनसेचे नगरसेवक मंदार हळबे यांच्या पुढाकाराने ही बैठक झाली. आम्ही विकासाविरोधात नाही, पण होणाऱ्या नुकसानीचे काय, असा सवाल करताना रस्ता रुंदीकरणाच्या आधी प्रायोगिक तत्त्वावर रिक्षातळ हटवावेत, ट्रान्सफॉर्मर दुसरीकडे स्थलांतरित करून वाहतुकीचे नियोजन करावे आणि मगच निर्णय घ्यावा. काहीजणांनी यावेळी क्लस्टर डेव्हलपमेंट तसेच इमारत पुनर्बांधणीला परवानगी द्यावी, अशा मागण्या केल्या. दरम्यान, रुंदीकरणाची टांगती तलवार पाहता काही रहिवाशांनी उच्च न्यायालयात धाव घेत तूर्तास स्थगिती मिळवली आहे. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात केडीएमसीने कॅव्हेट दाखल केल्याने बाधित होणाऱ्यांनी उच्च न्यायालयात रुंदीकरणाला आव्हान दिले आहे. सविता सोसायटी आणि शिव आशीष सोसायटीला स्थगिती मिळाल्याची माहिती व्यापारी व रहिवासी स्नेहल मोरे यांनी दिली. वाहतुकीचे नियोजन योग्य प्रकारे केले तर रुंदीकरणाची आवश्यकता भासणार नाही. केळकर हा एकदिशा मार्ग आहे. सद्य:स्थितीला १५ मीटरचा हा एकदिशा मार्ग जिल्ह्यातील सर्वात मोठा मार्ग म्हणता येईल. प्रशासन मोबदल्याची भाषा करीत आहे. परंतु, आम्हाला ते नको. आयुक्तांचा १८ मीटर रुंदीकरणाचा अट्टहास चुकीचा असल्याचे मोरे यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)