शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

बारामती अ‍ॅग्रो तर्फे मीरा भाईंदर महापालिकेला ६ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 21:03 IST

Mira Bhayander Municipal Corporation : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट पाहता आता पासूनच त्यासाठी पालिका सज्ज होत आहे अशा परिस्थितीत बारामती अ‍ॅग्रोने दिलेले ऑक्सिजन कांसंट्रेटरची कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

मीरारोड - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि बारामती अ‍ॅग्रोचे कार्यकारी संचालक रोहित पवार यांच्या मार्फत मीरा भाईंदर महापालिकेला ६ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर विनामूल्य देण्यात आले. राज्यातील कोरोना रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू होऊ नये, त्यांचा जीव वाचावा यासाठी बारामती अ‍ॅग्रो तर्फे राज्यातील कोरोना रुग्णालयांना ५०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात येणार आहेत. त्यापैकी मीरा भाईंदर शहराला शुक्रवारी ६ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आले. 

पालिकेच्या प्रमोद महाजन कोरोना उपचार केंद्रात पालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या कडे हे ६ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सुपूर्द करण्यात आले. यावेळी मीरा-भाईंदरचे जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे सह विक्रम तारेपाटील, ममता मोराईस, गुलामनबी फारुकी, सुरेश पांढरे, प्रवीण शाह आदी पदाधिकारी व पालिकेचे अधिकारी उपस्थित होते. आयुक्त ढोले यांनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिल्या बद्दल बारामती एग्रो आणि आमदार रोहित पवार यांचे आभार मानले.

आयुक्त म्हणाले की, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट पाहता आता पासूनच त्यासाठी पालिका सज्ज होत आहे अशा परिस्थितीत बारामती अ‍ॅग्रोने दिलेले ऑक्सिजन कांसंट्रेटरची कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी मोठी मदत होणार आहे. शहरातील सामाजिक संस्था व राजकीय पक्षांनी कोरोना साथरोगाच्या संकटात सतत सहकार्य केले असून या पुढेही कोरोनावर मात करण्यासाठी सर्वानी सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याBaramatiबारामतीOxygen Cylinderऑक्सिजनRohit Pawarरोहित पवारMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक