बांगलादेशी वेश्या दलालास अटक करून दोन तरुणींची सुटका

By धीरज परब | Updated: March 19, 2024 23:17 IST2024-03-19T23:17:32+5:302024-03-19T23:17:55+5:30

Mira Road Crime News: मीरा भाईंदरच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने एका बांगलादेशी वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या दलालास अटक करून त्याच्या तावडीतून दोन तरुणींची सुटका केली आहे.

Bangladeshi prostitute arrested and released two young women | बांगलादेशी वेश्या दलालास अटक करून दोन तरुणींची सुटका

बांगलादेशी वेश्या दलालास अटक करून दोन तरुणींची सुटका

मीरारोड - मीरा भाईंदरच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने एका बांगलादेशी वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या दलालास अटक करून त्याच्या तावडीतून दोन तरुणींची सुटका केली आहे.

अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षचे पोलीस निरीक्षक समीर अहिरराव सह पथकाने मिळालेल्या माहिती नुसार काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीतील अजित पॅलेस लॉज जवळ सापळा रचला होता . पोलिसांच्या बोगस गिऱ्हाईकासाठी  सुलतान उर्फ मोहम्मद आलमगिर अब्दुल मोजीत मंडल ( ३८ ) रा. चार बंगला, वर्सोवा, अंधेरी पश्चिम हा दोन तरुणींना घेऊन आला . त्याने बोगस गिऱ्हाईक सोबत पैसे घेऊन वेश्यागमना साथीचा सौदा निश्चित करताच पोलीस पथकाने धाड टाकून सुलतान याला ताब्यात घेतले.

बांगलादेशी असलेला सुलतान हा गेल्या ४ महिन्यां पासून कोणतेही अधिकृत परवाना नसताना बेकायदेशीपणे घुसखोरी करून रहात होता . तो व त्याचे आणखी दोन साथीदार मिळूनमुंबई, ठाणे, मीरा भाईंदर परिसरात लॉज मध्ये खोली घेण्यास सांगून वेश्यागमना साठी तरुणी पुरवत होते . त्यांचे कमिशन व तरुणीचा वेश्यागमनाचा मोबदला मिळून १५ हजार रुपये घेत होते . मोबाईल वरूनच हा धंदा चालत होता . सुलतान सह त्याच्या दोघा साथीदारांवर काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत . 

Web Title: Bangladeshi prostitute arrested and released two young women