शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
2
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
3
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
4
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
5
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
6
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
7
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
8
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
9
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
10
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
13
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
14
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
15
वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
16
‘लोक माझ्यावर जळतात, माझ्याविरोधात…’, पराभवानंतर अजिंक्य रहाणे संतापला, टीकाकारांवर बरसला
17
Peace Of Mind: नातं की ओझं? भगवान बुद्धांच्या 'या' एका सूत्राने दूर होईल तुमच्या मनातील सर्व गोंधळ!
18
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
19
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
20
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
Daily Top 2Weekly Top 5

Badlapur Crime: बदलापूर पुन्हा हादरले! चार वर्षाच्या विद्यार्थिनीवर स्कूल बसमध्ये अत्याचार, चालकच बनला नराधम

By पंकज पाटील | Updated: January 22, 2026 21:56 IST

Badlapur Rape Case: बदलापूर शहर पुन्हा एकदा लैंगिक अत्याचाराच्या घटनेने हादरले. एका चिमुकलीवर बसचालकानेच अत्याचार केला.

- पंकज पाटील, बदलापूरBadlapur Crime:बदलापूर पुन्हा शालेय मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेने हादरले. बदलापूर पश्चिम भागातील एका शाळेच्या स्कूल बसमध्ये चार वर्षाच्या विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी जाब विचारण्यासाठी गेलेल्या शाळा प्रशासनाने देखील स्कूल बस चालकाची बाजू घेतल्याने पालकांचा संताप अनावर झाला आणि हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले.

बदलापूर पश्चिम भागात नर्सरीमध्ये शिकणाऱ्या एका चार वर्षाच्या चिमुकलीला शाळेतून घेऊन स्कूल व्हॅन चालक घरच्या दिशेने निघाला होता. या मिनीबसमध्ये इतर शाळेचे विद्यार्थीही असल्यामुळे बस पोहोचायला नेहमी उशीर लागत होता. मात्र आज दुपारी दीड वाजता येणारी बस वेळेवर न आल्याने पीडित मुलीच्या आईने स्कूल बस चालकाला फोन केल्यावर ही बस तब्बल पाऊण तास उशिराने घराजवळ आली. 

मुलगी रडतच बसमधून उतरली

स्कूल बसमधून उतरल्यानंतर पीडित मुलगी रडत असल्याने तिच्या आईने तिला विचारणा केली. स्कूल बसमध्ये घडलेल्या प्रकारानंतर चिमुकलीने आपल्या पालकांना घडलेल्या घटनांची माहिती दिली. 

लागलीच पालक शाळा प्रशासनाकडे याबाबत जाब विचारण्यासाठी गेले. पीडित मुलीने घडलेला प्रकार मुख्याध्यापिकेच्या समोर सांगितल्यानंतर देखील संबंधित मुख्याध्यापिकेने पालकांना हवा तसा प्रतिसाद दिला नाही. 

चालकाला बघून मुलगी लपली

या प्रकरणाचे सत्य जाणून घेण्यासाठी स्कूल व्हॅनच्या चालकाला शाळेत बोलावल्यावर त्या चालकाला पाहून पीडित मुलगी घाबरून आपल्या पालकांच्या मागे लपली. त्यावरूनच घडलेल्या प्रकार किती गंभीर होता याची जाणीव झाली. 

शाळा प्रशासनाकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने पालकांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात घडलेल्या प्रकरणाची माहिती दिली. पोलिसांनी त्या चालकाला ताब्यात घेतले असून रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

महिला कर्मचारी नसल्याने घडली घटना?

स्कूल व्हॅनच्या चालकाने इतर मुलांना सोडण्यासाठी उशीर झाला त्यामुळे येण्यास विलंब झाला असे कारण पुढे केले, मात्र मुलीची अवस्था पाहिल्यानंतर पालकांना देखील काहीतरी चुकीचे घडल्याचे लक्षात आले. ज्या बस मधून ही चिमुकली प्रवास करीत होती, त्या बसमध्ये कोणतीही महिला अटेंडंट नसल्याने हा प्रकार घडल्याचे समोर येत आहे. त्यामुळे बस चालकासोबत शाळा प्रशासनावरही कारवाई करण्याची मागणी बदलापूरकर करीत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Badlapur Shaken: School Bus Driver Abuses Four-Year-Old Girl

Web Summary : A four-year-old girl was sexually assaulted in a school bus in Badlapur. The school's alleged support of the driver angered parents. Police arrested the driver after the girl reported the incident, highlighting concerns about the absence of female staff on the bus.
टॅग्स :badlapurबदलापूरSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPOCSO Actपॉक्सो कायदाCrime Newsगुन्हेगारी