राज्यपालांच्या हस्ते गुणवंत अधिकारी पुरस्काराने ठाणे जि प.चे अविनाश फडतरे सन्मानित
By सुरेश लोखंडे | Updated: May 27, 2025 21:23 IST2025-05-27T21:22:03+5:302025-05-27T21:23:06+5:30
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज पार पडलेल्या कार्यक्रमात फडतरे यांना गौरविण्यात आले.

राज्यपालांच्या हस्ते गुणवंत अधिकारी पुरस्काराने ठाणे जि प.चे अविनाश फडतरे सन्मानित
ठाणे : राज्य शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाने ‘यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान २०२५’ अंतर्गत गुणवंत अधिकारी पुरस्कार राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ठाणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांना आज प्रधान करून राज्य सरकारने सन्मानित केले आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज पार पडलेल्या कार्यक्रमात फडतरे यांना गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम, प्रधान सचिव एकनाथ डवले, कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. कोविड काळात जिल्हा परिषद सातारा येथे काम करताना प्रभावी नेतृत्व आणि विविध योजनांची अंमलबजावणी फडतरे यांनी केली आहे.
या कर्तव्याचे राज शासनाने दखल घेऊन जल जीवन मिशन, उपजीविका अभियान, ग्रामपंचायत डिजिटलायझेशन, स्वच्छ भारत मिशन, रोजगार हमी योजना यांसारख्या विविध उपक्रमांतील त्यांची उल्लेखनीय कामगिरी, पारदर्शक व लोकाभिमुख कामगिरी आदीं कर्तव्य दक्षतेस विचारात घेऊन गुणवंत अधिकारी पुरस्कारासाठी राज्य शासनाने फडतरे यांची निवड करून त्यांना सोमवारी समारंभ पूर्वक सन्मानित केले आहे.