शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

हिरेन कथित हत्याप्रकरणी ठाणे एटीएसकडून शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 5:21 AM

मुंबईतील ॲंटालिया इमारतीजवळ सापडलेल्या स्फोटकांच्या तपासात राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्याकडून वेगवेगळी माहिती मिळत असताना याच प्रकरणात बुधवारी सायंकाळी राज्य सरकारने मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी केली.

जितेंद्र कालेकर - 

ठाणे : मनसुख हिरेन कथित हत्या प्रकरणाची चौकशी दहशतवाद विरोधी पथकाकडून (एटीएस) आता वेगाने करण्यात येत आहे. एटीएसचे विशेष पोलीस महानिरीक्षक शिवदीप लांडे यांच्या पथकाने बुधवारी मनसुख यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मंगेश घाडगे यांच्यासह तीन डॉक्टरांची चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. (autopsy Doctors inquiry by  Thane ATS alleged murder case)मुंबईतील ॲंटालिया इमारतीजवळ सापडलेल्या स्फोटकांच्या तपासात राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्याकडून वेगवेगळी माहिती मिळत असताना याच प्रकरणात बुधवारी सायंकाळी राज्य सरकारने मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी केली. त्याचवेळी गेल्या १० ते १२ दिवसांपासून काहीशा संथ गतीने सुरू असलेल्या एटीएसच्या तपासालाही आता गती यायला सुरुवात झाली आहे. बुधवारी लांडे यांनी एटीएसच्या ठाणे कार्यालयास भेट दिली. त्या वेळी उपायुक्त राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त श्रीपाद काळे यांच्या पथकाला या प्रकरणी कसून चौकशीचे आदेश दिले. या हत्या प्रकरणात येणारे सर्व प्रकारचे बारकावे पुन्हा एकदा तपासून पाहण्याचे आदेश त्यांनी दिले. मनसुख यांनी मृत्यूपूर्व राज्याचे मुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रातील तपशील तसेच शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकाचा प्राथमिक अहवाल अशा अनेक बाबींचा नव्याने अभ्यास केला. दरम्यान, मनसुख यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणारे ठाणे महापालिकेच्या न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मंगेश घाडगे, डॉ. राजेश्वर पाटे आणि डॉ. वैभव बारी यांनाही बुधवारी तब्बल १३ दिवसांनंतर एटीएसच्या ठाणे कार्यालयात पाचारण केले होते. डॉ. घाडगे यांच्या समितीने यापूर्वीच व्हिसेरा प्रिजर्व अ‍ॅण्ड ओपिनियन रिजर्व, असे मत देऊन मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट केले नव्हते. परंतु, सूत्रांच्या म्हणण्यानुसार, मनसुख यांच्या फुप्फुसामध्ये काही प्रमाणात खाडीचे पाणी मिळाले होते. एखाद्या हत्या प्रकरणात एखाद्या व्यक्तीला आधीच मारले तर फुप्फुसामध्ये पाणी मिळत नाही, असे बोलले जाते. मग, हिरेन प्रकरणात नेमक्या कोणत्या शक्यता असू शकतात? पाण्यात डुंबविण्यात आले की ते बुडाल्यानंतर हे पाणी शरीरात गेले? तसेच तोंडात रुमाल नेमके कशामुळे होते? हे रुमाल काढतेवेळी पंचनामा करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याचीही चौकशी करण्यात आली. मृतदेह बाहेर काढल्यानंतर कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मुंबईच्या सीआययू युनिटचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे एका सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाºयासह तिथे आले होते. वाझे तिथे नेमकी कोणत्या कारणासाठी आले होते? अशा अनेक प्रश्नांचे खल एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चर्चेत ठाण्यातील बैठकीत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हरियाणाच्या लॅबचेही मत घेणार एटीएसमनसुख हिरेन यांच्या मृतदेहातील फुफ्फुसामधील पाण्याबाबत शवविच्छेदन करणाºया डॉक्टरांच्या पथकात एकमत नाही. त्यामुळे ‘इट इज ओन्ली स्क्रिनिंग’ असे या अहवालात म्हटले आहे. पाणी आहे की नाही हे नेमकी स्पष्ट होत नाही. अन्य तज्ज्ञ डॉक्टरांकडून मत घ्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे मुंबई एटीएसचे पथक आता हरियाणा येथील न्यायवैद्यक विभागातून याबाबतचे मत मागविणार किंवा तिकडील प्रयोगशाळेत मनसुख यांच्या फुफ्फुसाचा भाग पाठविणार असल्याची माहिती एटीएसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने ‘लोकमत’ला दिली. 

टॅग्स :Mansukh Hirenमनसुख हिरणPoliceपोलिसdoctorडॉक्टरsachin Vazeसचिन वाझेthaneठाणे