शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
6
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
7
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
8
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
9
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
10
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
11
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
12
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
13
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
14
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
15
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
16
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
17
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
18
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
19
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
20
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी

बुलेट ट्रेनसाठी भाजपची आजच्या ऑनलाइन महासभेला हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 12:44 AM

मागील काही महिने बुलेट ट्रेनच्या जमिनीच्या मोबदल्यात निधी असा प्रस्तावही सत्ताधाऱ्यांनी राखून ठेवला आहे, त्याला पाठिंबा देण्यासाठी भाजपने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

ठाणे : ऑनलाइनऐवजी प्रत्यक्ष महासभा घ्यावी, यासाठी हट्ट करणारे भाजपचे नगरसेवक शुक्रवारी होणाऱ्या ऑनलाइन महासभेला हजेरी लावणार आहेत. गेल्या काही महासभांमध्ये सहभागी न झाल्यामुळे चुकीचे विषयही मंजूर करून घेतले जात असल्यानेच शुक्रवारी होणाऱ्या ऑनलाइन महासभेत सहभागी होण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या गटमिटिंगमध्ये घेतल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली. मागील काही महिने बुलेट ट्रेनच्या जमिनीच्या मोबदल्यात निधी असा प्रस्तावही सत्ताधाऱ्यांनी राखून ठेवला आहे, त्याला पाठिंबा देण्यासाठी भाजपने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.ठाणे महापालिकेच्या महासभा वेबिनारद्वारे आयोजित केल्या जात आहेत. त्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या महासभेत गोंधळ झाला होता. त्यामुळे ती प्रत्यक्ष घ्यावी, अशी मागणी भाजपने केली होती. कोविड नियमावलींचे पालन करून संसद आणि राज्य विधिमंडळाचे अधिवेशन प्रत्यक्ष पार पडले. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेची महासभाही प्रत्यक्ष घ्यावी, अशी मागणी करून ती गडकरी किंवा डॉ. घाणेकर नाट्यगृहात घेण्याची सूचना केली होती. यानंतर महापौर नरेश म्हस्के यांनी शासनाकडे पत्रव्यवहार केला होता. परंतु नगरविकासने त्यावर अद्याप उत्तर दिलेले नाही. अशातच आता शुक्रवारच्या ऑनलाइन महासभेत सहभागी होण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. तीत क्लस्टर, विकास योजना, जाहिरात, टीएमटी बस खरेदी, कोविडचे साहित्य आदींसह इतर काही महत्त्वाचे विषय पटलावर आहेत. त्यामुळे महासभेत सहभागी होणार असल्याची माहिती भाजपने दिली.सभेसाठी आंदोलनगेल्या दोन वेबिनार महासभांमध्ये भाजपच्या नगरसेवकांना अनेक विषयांवर भूमिका मांडता आलेली नव्हती. यामुळे महासभा प्रत्यक्ष घ्यावी, या मागणीसाठी महापालिका मुख्यालयात भाजपच्या नगरसेवकांनी दोन महासभांमध्ये आंदोलन केले होते. 

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनBJPभाजपा