शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे: चिमुरडीवर अत्याचार करून खून करणाऱ्याला न्यायालयाच्या आवारातच चोप देण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 09:47 IST

Thane Rape Case: आसिफने तिच्यावर लैंगिक अत्याचारही केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी बाथरूमच्या खिडकीमधून तिला खाली फेकून दिले होते.

ठाणे : दहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिला सहाव्या मजल्यावरून खाली फेकणारा नराधम आसिफ मन्सुरी याला शरद पवार गटाच्या कार्याध्यक्षा मर्जिया पठाण आणि त्यांच्या महिला सहकाऱ्यांनी कोर्टाच्या आवारातच चोप देण्याचा बुधवारी प्रयत्न केला. ठाणेनगर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. दरम्यान, त्याची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने आता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

मुंब्र्याच्या ठाकूरपाडा भागात मित्र-मैत्रिणींसोबत खेळत असलेल्या या अल्पवयीन पीडितेला आरोपी मन्सुरीने खेळणी देण्याचे आमिष दाखवून घरी नेले. 

इमारतीच्या सहाव्या मजल्यावर राहणाऱ्या आसिफने तिच्यावर लैंगिक अत्याचारही केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी बाथरूमच्या खिडकीमधून तिला खाली फेकून दिले होते. याप्रकरणी मन्सूर याला मुंब्रा पोलिसांनी अटक केली होती. त्याची १६ एप्रिल रोजी पोलीस कोठडी संपल्याने पोलिसांनी त्याला न्यायालयात आणले होते. त्यावेळी आधीच न्यायालयात उपस्थित असलेल्या मर्जिया यांनी आपल्या महिला सहकाऱ्यांच्या मदतीने पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मन्सूर याच्यावर चप्पल उगारली. त्याला मारहाणीचा प्रयत्न केला. त्याचवेळी बंदोबस्तावरील पोलिसांनी त्यांना अटकाव केला. 

दिसेल तेथे आम्ही ‘प्रसाद’ देऊ

मृत पावलेल्या चिमुरडीची जात - धर्म शोधून त्याचे राजकारण करण्याचा प्रयत्न होत आहे. पण, आपल्या मते ती एक मुलगी होती. माझी छोटी बहीण होती. एवढेच महत्त्वाचे आहे. अत्याचार होत असतील तर नराधमांना भीती वाटेल, असे काम करायला हवे. 

या नराधमाला मी चोप देण्याचा प्रयत्न केला. चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या मन्सूरचा खटला जलदगती न्यायालयात चालविला नाही अन् तो जर जामिनावर सुटला तर तो दिसेल तिथे आम्ही पुन्हा त्याला प्रसाद देऊ. त्याची जबाबदारी सरकारची असेल, असा इशाराही मर्जिया यांनी दिला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmumbraमुंब्राPoliceपोलिसSexual abuseलैंगिक शोषणDeathमृत्यू