शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

ठाण्यातील कुप्रसिद्ध मटकाकिंग बाबू नाडर याच्यावर खुनी हल्ला: तिघांची धरपकड

By जितेंद्र कालेकर | Published: September 22, 2019 10:33 PM

एका क्षुल्लक कारणावरुन कुप्रसिद्ध मटका किंग बाबू नाडर याच्यावर चाकूने वार करुन खूनाचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील तिघांची कोपरी पोलिसांनी धरपकड केली आहे. तिघांमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश असून त्यांच्यापैकी एकावर खूनाचा प्रयत्न, चोरी आणि हाणामारी असे गुन्हे दाखल आहेत.

ठळक मुद्देपोटावर केले सात ते आठ वारदोघे अल्पवयीन आरोपी ताब्यातकोपरी पोलिसांची कारवाई

ठाणे : संपूर्ण ठाणे जिल्ह्यात कुप्रसिद्ध असलेला मटकाकिंग बाबू नाडर याच्यावर चाकूचे वार करून पलायन केलेल्या हरेष तेलुरे (२८) याला कोपरी पोलिसांनी रविवारी अटक केली असून, दोन अल्पवयीन आरोपींनाही याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. या खुनी हल्ल्यासाठी त्यांनी वापरलेला चाकू पोलिसांनी जप्त केला आहे. दरम्यान, नाडर याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.कोपरीतील सिद्धार्थनगर ते कोपरी पुलाकडे जाणा-या वळणावरील एका मिष्ठान्न विक्रेत्याच्या दुकानाच्या बाजूलाच शनिवारी रात्री १०.४५ ते ११.१५ वाजण्याच्या सुमारास नाडर एका स्कूटरने आला. त्यावेळी दबा धरून बसलेल्या तिघांनी त्याच्यावर अचानक हल्ला केला. एका आरोपीने त्याच्यावर दारूच्या नशेतच २२ इंची चाकूने सपासप सात ते आठ वार केले. या हल्ल्यानंतर तिघेही रात्रीच पसार झाले होते. हल्ला करण्याच्या वेळी बेभान झालेल्या एका अल्पवयीन आरोपीच्या तावडीतून नाडरची सुटका करण्यासाठी त्याच्या काही पंटर लोकांनी प्रयत्न केले होते. मात्र, त्यांच्यावरही त्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने नाडरची या हल्ल्यातून सुटका झाली नाही. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नाडरला त्याच्याच क्लबवरील लोकांनी तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आगारकर आणि निरीक्षक दत्ता गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार तुकाराम डुंबरे, पोलीस कॉन्स्टेबल नितीन चव्हाण, गणेश पाटोळे आणि अरुण कांबळे यांच्या शोध पथकाने बुलडाणा येथे पलायनाच्या तयारीत असलेल्या हरेष याच्यासह तिघांनाही रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कसारा रेल्वेस्थानक येथून ताब्यात घेतले. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला असून, यातील हरेषला रविवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली. तर, उर्वरित दोन आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना भिवंडीच्या बालन्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली....................हल्ल्याचे कारणदोनच दिवसांपूर्वी नाडरच्या काही पंटर लोकांशी या प्रकरणातील एका अल्पवयीन आरोपीचा वाद झाला होता. याच वादातून नाडरच्या क्लबमधील बाबू नामक कर्मचा-याला या अल्पवयीन आरोपीने मारहाण केली होती. हा वाद नाडरने सोडविला होता. हाच वचपा काढण्यासाठी अल्पवयीन आरोपीसह तिघांनी त्याच्यावर शनिवारी रात्री अचानक हल्ला केल्याची माहिती सूत्रांनी दिली...........................स्कूटरवर आला आणि घात झाला...नेहमी आलिशान कारमध्ये येणारा मटकाकिंग नाडर हा शनिवारी नेमका एका स्कूटरने आला. त्याच्याबरोबर त्याची नेहमीची माणसेही जवळ नव्हती. हीच संधी साधत आरोपींनी त्याच्यावर हल्ला करीत पोटावर दोन्ही बाजूंनी चाकूने वार केले..........................अल्पवयीन आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमीहल्लेखोरांपैकी एका अल्पवयीन आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याने सात महिन्यांपूर्वीही एकाच्या भांडणात मध्यस्थी करणा-या हरुण रेलवानी यांच्यावर खुनी हल्ला केला होता. हरुण याने त्याला चोरीच्या गुन्ह्यातही पकडून दिले होते. याच रागातून त्याने हरुण याच्या पोटावर वार केले होते. त्याच्यावर बाबू नाडर याच्यासह खुनाचे प्रयत्न केल्याचे दोन गुन्हे, एक हाणामारीचा, तर एक चोरीचा गुन्हा कोपरी पोलीस ठाण्यात दाखल आहे......................नाडरलाही झाली होती अटककोपरीत मटका चालविणा-या बाबूला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने काही महिन्यांपूर्वी अटक केली होती. त्याच्याकडे जुगारात हरलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी झाली होती. याच प्रकरणात तत्कालीन सहपोलीस आयुक्त व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण यांच्या आदेशाने त्याला अटकही झाली होती. त्याच्या अड्ड्यावर अनेकवेळा धाड टाकूनही तो पोलिसांना हुलकावण्या देत होता. त्याच्यावरील हल्ल्याने पोलीस आणि अवैध धंदे करणा-यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक