शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

नाराजांची वेगळी चूल, नरेंद्र मेहता यांना काटशह देण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2018 2:58 AM

आमदार नरेंद्र मेहता यांनी पक्षातील महत्त्वाची पदे बाहेरून आलेल्यांना दिल्याने निष्ठावंत दुखावले आहेत. या नाराजांनी अटल फाउंडेशनची स्थापना करून वेगळी चूल मांडली आहे.

- राजू काळेभार्इंदर - आमदार नरेंद्र मेहता यांनी पक्षातील महत्त्वाची पदे बाहेरून आलेल्यांना दिल्याने निष्ठावंत दुखावले आहेत. या नाराजांनी अटल फाउंडेशनची स्थापना करून वेगळी चूल मांडली आहे. ही संस्था मेहता यांच्या स्पर्धक माजी महापौर गीता जैन यांची समर्थक मानली जात असल्याने संस्थेची स्थापना म्हणजे मेहता यांना काटशह देण्याचा एक प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.१९८० मध्ये जनता पार्टीच्या नामकरणानंतर मीरा-भार्इंदरमध्ये भाजपाला ज्यांनी तारले, त्यांना सध्याच्या स्थानिक नेतृत्वाने डावलण्यास सुरुवात केली आहे. पक्षात बाहेरून आलेल्यांना मानसन्मान देत त्यांच्या हाती महत्त्वाची पदे दिली जात असल्याने ज्येष्ठांच्या मनात असंतोष पसरला आहे.निष्ठावंतांना डावलून त्यांच्याकडील पदे काढून घेत मर्जीतील पदाधिकाऱ्यांना पदावर विराजमान करण्याचा फंडा सध्या सुरू झाल्याने ज्येष्ठांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. जनसंघापासून भाजपाला तारणारे गंगाधर गाडोदिया कुटुंब, भास्करराव धामणकर कुटुंब, खिटे कुटुंब, वंदना अरुण गोखले, ऊर्मिला गोखले, चितारी बंधू, गंगाधर पाटील, डॉ. शरद कुळकर्णी, हसमुख तेली यांची नावे सध्या भाजपाच्या पाट्यांवर कुठेही दिसतनाहीत.या ज्येष्ठ पदाधिकाºयांनंतर त्यांच्या पुढील पिढ्यांनी भाजपाची धुरा सांभाळण्यास सुरुवात केली. जनसंघाचा १९७६ मध्ये शहरात प्रभाव असताना त्यावेळी भार्इंदर पश्चिम ग्रामपंचायत निवडणुकीत या पक्षाचे सहा, काँग्रेसचे सहा व तीन अपक्ष उमेदवार निवडून आले. त्यावेळी गाडोदिया, गिल्बर्ट यांचे वडील जॉन यांनी काँग्रेसला एकाकी पाडून गिल्बर्ट यांना पहिले सरपंचपद बहाल केले.जनसंघाचा वरचष्मा कायम राखून भाजपाच्या स्थापनेनंतर पक्षातील वरिष्ठांनी पक्षाचा प्रभाव कायम ठेवला.२००७ मधील महापालिका निवडणुकीत राष्टÑवादीचे त्यावेळचे स्थानिक नेतृत्व गिल्बर्ट यांनी अपक्ष म्हणून निवडून आलेले नरेंद्र मेहता यांना महापौरपदी विराजमान केले. महापौरपद हाती येताच मेहता यांनी मागे वळून न पाहता स्थानिकस्तरावर आपले वर्चस्व निर्माण केले. त्यांनी पक्षातील जुन्यांचा मानसन्मान काढून घेत तरुणांना संधी देण्यास सुरुवात केली.२०१२ मधील काँग्रेस-राष्टÑवादीची सत्ता उलथवून टाकून २०१५ मध्ये सेना-भाजपाची सत्ता स्थापन केली. यावेळी त्यांनी महापौरपदावर आपली वहिनी व सध्याच्या महापौर डिम्पल मेहता यांना विराजमान करण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, गीता जैन यांनी आपले बंधू संजय पूनमिया यांच्या माध्यमातून पक्षातील वरिष्ठांमार्फत महापौरपदावर उडी घेतली. यामुळे मेहता यांच्या प्रयत्नाला सुरुंग लागला. यानंतर, मेहता व जैन वादाला तोंड फुटले. पुढे हा वाद गटबाजीत परावर्तित होऊन सध्या दोघेही एकमेकांना पाण्यात पाहत आहेत.एकूण १०० ज्येष्ठांसह नाराजांनी आपली वेगळी चूल मांडली आहे. त्याला अटल फाउंडेशन असे गोंडस नाव देऊन ही संस्था थेट जैन यांची समर्थक मानली जात आहे.भाजपा किंवा स्थानिक नेतृत्वाने कोणत्याही ज्येष्ठांना डावललेले नाही, अशी भावना त्यांच्यात रुजवण्याचे कटकारस्थान सुरू आहे. त्याच माध्यमातून स्थापन करण्यात आलेली अटल फाउंडेशन ही संस्था भाजपातीलच ज्येष्ठांची असल्याने पक्षावर त्याचा परिणाम होणार नाही. - चंद्रकांत वैती, उपमहापौरअटल फाउंडेशनशी माझा कोणताही संबंध नाही. मात्र, भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाला कंटाळून पक्षातील ज्येष्ठांनी संस्था स्थापन केली आहे. या संस्थेच्या पाठीशी मी सदैव उभी राहणार असून मलाही ते वेळप्रसंगी सहकार्य करतील, अशी अपेक्षा आहे.- गीता जैन, माजी महापौर

टॅग्स :BJPभाजपाMira Bhayanderमीरा-भाईंदर