अनैतिक संबंधातून महिलेवर वार; उल्हासनगरमधील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 14:18 IST2022-03-03T14:18:17+5:302022-03-03T14:18:30+5:30
उल्हासनगर : कॅम्प नं. ५ येथील वसंत शहा दरबार मंदिरासमोर फुले विकण्याचे काम करणाऱ्या ४२ वर्षीय महिलेवर सोमवारी सकाळी ...

अनैतिक संबंधातून महिलेवर वार; उल्हासनगरमधील धक्कादायक घटना
उल्हासनगर : कॅम्प नं. ५ येथील वसंत शहा दरबार मंदिरासमोर फुले विकण्याचे काम करणाऱ्या ४२ वर्षीय महिलेवर सोमवारी सकाळी ९ वाजता प्रियकराने कोयत्याने हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. महिलेवर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी हिललाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हल्ला झालेल्या महिलेच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले हाेते. तिची ओळख रघुनाथ भाेईर याच्यासोबत झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात होऊन ते एकत्र राहू लागले. कालांतराने आपली मुले मोठे झाली असून आपल्याला नाव ठेवीत असल्याची जाणीव महिलेला झाली. त्यामुळे तिने भोईर याला वेगळे राहण्याची विनंती केली. त्यास भोईर याने नकार देऊन वेगळे राहण्यासाठी पाच लाखांची मागणी केली. यातून सोमवारी सकाळी ९ वाजता वसंत शहा दरबार मंदिरासमोर दोघांत वाद झाला. त्यावेळी भोईर याने या महिलेवर कोयत्याने वार केले. हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. तिला मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी हिललाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.