ठाण्यात अल्पवयीन मोलकरणीवर अत्याचार, पोलिसांनी केली चालकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2017 21:50 IST2017-11-28T21:49:57+5:302017-11-28T21:50:07+5:30
एका १७ वर्षीय मोलकरणीवर अत्याचार करणा-या हरनाम चौहान (२९, रा. आतकोनेश्वर नगर, कळवा) याला कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. त्याला ३० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

ठाण्यात अल्पवयीन मोलकरणीवर अत्याचार, पोलिसांनी केली चालकाला अटक
ठाणे : एका १७ वर्षीय मोलकरणीवर अत्याचार करणा-या हरनाम चौहान (२९, रा. आतकोनेश्वर नगर, कळवा) याला कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. त्याला ३० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
घोडबंदर रोडवरील, आनंदनगर येथील ‘फॅकिन बेलेज्जा’ या इमारतीमधील रहिवाशी रघुवीर जव्हेरी यांच्याकडे पिडीत मुलगी घरकाम करते. तर त्यांच्याच पाचपाखाडी येथील कार्यालयात हरनाम हा चालकाचे काम करतो. किरकोळ कामासाठी त्याचे जव्हेरी यांच्या घरी येणे- जाणे असायचे. याचाच गैरफायदा घेऊन जुलै आणि आॅगस्ट २०१७ मध्ये त्याने तिचा विनयभंग करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर याची कोणाकडे वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकीही त्याने तिला दिली. दरम्यानच्या काळात ती गरोदर राहिल्याने तिच्या पालकांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी चौकशी केल्यानंतर तिने ही आपबित्ती सांगितली. अखेर याप्रकरणी तिने २७ नोव्हेंबर रोजी कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याच्याविरुद्ध विनयभंग, लैंगिक अत्याचार करणे तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक एम. के. पोटे हे अधिक तपास करीत आहेत.