लस न देताच उत्सव करायला सांगणे म्हणजे ‘बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:37 AM2021-04-12T04:37:28+5:302021-04-12T04:37:28+5:30

मीरा रोड : मीरा-भाईंदर शहराची लोकसंख्या आजच्या घडीला १० ते १२ लाखांच्या घरात सांगितली जाते; पण केवळ एक लाख ...

Asking to celebrate without vaccination is like 'Begane Shaadi Mein Abdullah Diwana' | लस न देताच उत्सव करायला सांगणे म्हणजे ‘बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना’

लस न देताच उत्सव करायला सांगणे म्हणजे ‘बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना’

Next

मीरा रोड : मीरा-भाईंदर शहराची लोकसंख्या आजच्या घडीला १० ते १२ लाखांच्या घरात सांगितली जाते; पण केवळ एक लाख लसी दिल्या त्या संपलेल्या असताना लसीचा आणखी पुरवठा न करताच लस उत्सव साजरा करा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करीत जाहीर केले आहे; पण लस न देताच उत्सव साजरा करा सांगणे म्हणजे ‘बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना’ अशी स्थिती ओढावली असल्याने संताप व्यक्त होत होत आहे.

मीरा-भाईंदरसाठी सरकारकडून एक लाख सहा हजार ६२० लस पुरविण्यात आल्या होत्या; परंतु गेल्या गुरुवारी रात्री केवळ ३ हजार ३४० लस शिल्लक राहिल्याने महापालिकेने लसीकरण बंद केले आहे. ११ पैकी पालिकेची सहा लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली आहेत, तर पाच लसीकरण केंद्रांवर रोज दुसरा डोस बाकी असलेल्या प्रत्येकी १०० लोकांनाच लस दिली जात आहे. कोरोनाचा कहर वाढला असताना दुसरीकडे लसीकरण बंद झाल्याने शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकीकडे ११ एप्रिलपासून देशभरात लसीकरण उत्सव साजरा करण्याचे जाहीर केले आहे; पण पालिकेकडे लसच नाही, तर उत्सव कसला साजरा करताय असा सवाल नागरिकांनी थेट मोदींना केला आहे.

कोरोनाच्या संसर्गात लोकांचे जीव जात असताना केंद्रातील भाजप सरकार मात्र निव्वळ स्वतःची राजकीय पोळी भाजत विरोधकांवर राजकीय सूड उगवीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. राज्याची लोकसंख्या आणि तेथील कोरोना रुग्णांची संख्या विचारात घेऊन लसींचे वाटप केंद्रातील मोदी सरकारने करायला हवे होते; परंतु त्यांनी केवळ भाजपशासित राज्यातच जास्त प्रमाणात लसी देऊन विरोधी पक्षांच्या ताब्यातील राज्यांना मात्र तुटपुंजी लस दिल्याचा आरोपही गंभीर आहे. ज्येष्ठ नागरिक असलेले अनंत आंगचेकर यांनीही पंतप्रधान मोदी आणि भाजपचे हे घाणेरडे राजकारण देशाला विनाशाच्या आणि सूडाच्या खाईत लोटणारे आहे. लोकांना दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे अशी यांची गत आहे. लोकांच्या जीव आणि आरोग्याशी खेळणाऱ्या या मोदी सरकारला माफ करता येणार नाही.

------------------

भाजपला कोरोनाची महामारी कितीही पसरली व कितीही लोकांचे बळी गेले तरी त्यांना त्यांची सत्ता आणि राजकारण प्यारे आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या आणि कोरोना रुग्णांची संख्या विचारात घेऊन केंद्राने लसींचा पुरवठा करणे आवश्यक असताना मोदी आणि भाजप केवळ सूडबुद्धी व आकस ठेवून राज्यातील जनतेवर अत्याचार, अन्याय करीत आहेत. मोदींनी जाहीर केलेला हा लसीकरण उत्सव नसून फसवीकरण उत्सव आहे.

नीलम ढवण, गटनेत्या, शिवसेना

लसीकरण उत्सवाबाबत अजून कोणतेही मार्गदर्शक निर्देश आलेले नाहीत. पालिकेकडे लसींचा साठा नसल्याने लसीकरण उत्सव साजरा करणे उद्या तरी शक्य नाही. सरकारकडे एक लाख लस मागितल्या आहेत. लसींचा पुरवठा झाल्यावर आवश्यक ते सर्व नियोजन करून लसीकरण उत्सव सुरू करणार आहोत.

- डॉ. अंजली पाटील, लसीकरण अधिकारी, महापालिका

Web Title: Asking to celebrate without vaccination is like 'Begane Shaadi Mein Abdullah Diwana'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.