शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

नियमात न अडकता पूरग्रस्तांना मदत, आशीष शेलार यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 2:25 AM

कल्याण : पूरग्रस्तांना मदत करताना अधिकृत-अनधिकृत तसेच कोणत्याही शासकीय नियमांत अडकून न पडता नुकसान झालेल्या सर्वांनाच सरकार मदत करणार ...

कल्याण : पूरग्रस्तांना मदत करताना अधिकृत-अनधिकृत तसेच कोणत्याही शासकीय नियमांत अडकून न पडता नुकसान झालेल्या सर्वांनाच सरकार मदत करणार असल्याचे शिक्षणमंत्री आशीष शेलार यांनी सांगितले.कल्याणमधील पूरग्रस्त भागातील रहिवाशांशी रविवारी शेलार यांनी संवाद साधला. अनधिकृत घोषित करून काही पूरग्रस्त भागात प्रशासनाने सर्वेक्षण केलेले नाही. येथील असंख्य नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून त्यांना न्याय दिला जाईल, असे शेलार म्हणाले. येथील नागरिकांच्या अडचणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवून शेवटच्या माणसापर्यंत मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करू, असा दिलासाही त्यांनी नागरिकांना दिला.कल्याण पश्चिमेत मोबाइल मेडिकल उपचार केंद्राचे उद्घाटन शेलार यांनी केले. या केंद्रात पुढील १० दिवस मोफत तपासणी व औषधोपचार करण्यात येणार आहे. आमदार नरेंद्र पवार यांच्या विशेष निधीतून साकारलेल्या साई उद्यानाचे (रोझाली) उद्घाटनही त्यांनी केले. कल्याणच्या वैभवात भर घालणारे हे उद्यान ठरेल, असे कौतुकही शेलार यांनी केले.महाराष्ट्र राज्य शालेय क्रीडा संघर्ष समितीसोबतही शेलार यांची बैठक झाली. नगरसेवक अर्जुन भोईर जनसंपर्क कार्यालयासमोर भाजप सदस्यता अभियान आणि मतदारनोंदणी कार्यक्र म झाला. यावेळी आ. पवार यांच्या जनसंपर्ककार्यालयामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना शेगडीचे तसेच आयुष्यमान भारत योजनेतील लाभार्थ्यांना कार्डचे वाटप झाले. यावेळी खासदार कपिल पाटील, कोळी महासंघ उपनेते देवानंद भोईर, नगरसेवक वरुण पाटील, नगरसेविका वैशाली पाटील, भाजयुमो प्रदेश सचिव निखिल चव्हाण, परिवहन सदस्य कल्पेश जोशी, सदा कोकणे, हेमा पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.८० दिव्यांगांची पूरग्रस्तांसाठी १० हजारांची मदतअपंग विकास महासंघाने केडीएमसीकडून मिळालेल्या अर्थसाहाय्यातून व्यवसाय सुरू करणाऱ्या ८० दिव्यांगांनी एक दिवसाची कमाई एकत्र करून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १० हजारांचा धनादेश शिक्षणमंत्री शेलार यांना सुपूर्द केला. यावेळी अशोक भोईर, गोरख नाईक, लक्ष्मण शिर्के यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.पूरग्रस्तांना साहित्याचे वाटपगोविंदवाडी परिसरात पूर आल्याने अनेकांच्या घरांत पाणी घुसले होते. रविवारी शेकडो कुटुंबीयांना चार दिवस पुरेल इतका शिधा आणि चादरींचे वाटप करण्यात आले. सामाजिक भान जागृत ठेवून काम करणाºया लोकप्रतिनिधींची समाजाला कायम आपुलकी असते. राजकारण बाजूला ठेवून आ. पवार यांचे मदतकार्य कौतुकास्पद आहे, असे शेलार यावेळी म्हणाले.

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारkalyanकल्याण