क्षुल्लक कारणावरुन हॉटेल चालकाच्या खूनाचा प्रयत्न करणाऱ्यास अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 12:19 PM2021-10-22T12:19:25+5:302021-10-22T12:21:51+5:30

चिकन लॉलीपॉपची प्लेट हॉटेलच्या बाहेर न दिल्याच्या रागातून प्रशांत पुजारी (३८, रा. कळवा, ठाणे) या हॉटेल चालकावर चाकूने खूनी हल्ला करणाºया अशोक मरसाळे याला राबोडी पोलिसांनी नुकतीच अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांनी शुक्रवारी दिली

Arrested for attempted murder of hotel driver for trivial reasons | क्षुल्लक कारणावरुन हॉटेल चालकाच्या खूनाचा प्रयत्न करणाऱ्यास अटक

हॉटेलच्या बाहेर मागितली होती जेवणाची प्लेट

Next
ठळक मुद्देहॉटेलच्या बाहेर मागितली होती जेवणाची प्लेटराबोडी पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : चिकन लॉलीपॉपची प्लेट हॉटेलच्या बाहेर न दिल्याच्या रागातून प्रशांत पुजारी (३८, रा. कळवा, ठाणे) या हॉटेल चालकावर चाकूने खूनी हल्ला करणाºया अशोक मरसाळे याला राबोडी पोलिसांनी नुकतीच अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांनी शुक्रवारी दिली. त्याला २६ आॅक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
कळव्यातील दत्तवाडी येथील रहिवासी पुजारी यांचे राबोडीतील मार्क्सनगर येथे अभिरु ची चायनीज विक्र ीचे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये मरसाळे हा १५ आॅक्टोबर २०२१ रोजी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास जेवणासाठी गेला होता. त्यावेळी त्याने चिकन लॉलीपॉपची आॅर्डर दिली. आॅर्डर दिल्यानंतर त्याने प्लेट हॉटेलबाहेर मागविली. हॉटेल मालक पुजारी यांनी प्लेट हॉटेलबाहेर देण्यास नकार दिला. याचाच राग आल्याने अशोकने प्रशांत यांच्या डोक्यावर आणि हातावर चाकूने सपासप वार केले. त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या एका खासगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले. हल्लेखोर हा हॉटेलच्या बाजूलाच वास्तव्याला असूनही तो पसार झाला होता. तो पोलिसांना सतत गुंगारा देत होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरतोडे आणि पोलीस निरीक्षक रामचंद्र वळतकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक योगेश धोंगडे, उपनिरीक्षक महेश जाधव, श्रीकांत चव्हाण, पोलीस हवालदार राजा पाटील आणि सतीश कुलथे आदींच्या पथकाने त्याला २० आॅक्टोंबर रोजी अटक केली.

Web Title: Arrested for attempted murder of hotel driver for trivial reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app