शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
4
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
5
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
6
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
7
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
8
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
9
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
10
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
11
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
12
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
13
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
14
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
15
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
16
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
18
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
19
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
20
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा

खून व जबरी चोरीतील गुन्हेगाराला 19 वर्षांनंतर अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2019 6:22 PM

कोयना पोलीस गेल्या 19 वर्षांपासून त्याचा शोध घेत असून या गुन्ह्यातील तिघांना यापूर्वी 7 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा झाली आहे.

- सदानंद नाईक

उल्हासनगर : खून व जबरी चोरीतील एका फरार आरोपीला शहर गुन्हे अन्वेषण विभागाने तब्बल 19 वर्षानंतर जेरबंद करून सातारा कोयना पोलिसांच्या स्वाधीन केले. कोयना पोलीस गेल्या 19 वर्षांपासून त्याचा शोध घेत असून या गुन्ह्यातील तिघांना यापूर्वी 7 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा झाली आहे.

उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांना खून व जबरी चोरीतील एक फरार आरोपी गेल्या 19 वर्षांपासून लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथक गेली महिनाभर त्याच्या मागावर होते. गुरुवारी 2 मे रोजी सदर आरोपी कर्जत येथील भिसेगाव बस स्टॅन्डवर येणार असल्याची माहिती मिळाल्यावर सापळा लावण्यात आला. सदर आरोपी बस स्टँडवर येताच त्याला जेरबंद करण्यात आले. सुरेश भीमा गोर असे आरोपीचे नाव असून त्याने खून व जबरी चोरीची कबुली दिली. त्याला कोयना पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख तरडे यांनी दिली.

आरोपी सुरेश गोर याने साथीदाराच्या मदतीने 8 ऑगस्ट 2001 मध्ये सातारा कोयना आंबेनळी घाटात एका मालवाहू ट्रकच्या समोर मारुती कार आडवी लावली होती. चाकू व लोखंडी सळईचा धाक दाखवून ट्रक चालक, क्लिनर व एका प्रवाशाचे हात पाय बांधून खोल दरीत ढकलून दिले. तर ट्रक मधील 9 लाख 31 हजाराचे हमाम व लाईफबॉय साबणाचा माल चोरून नेला. दरीत ढकलून दिलेल्या पैकी ट्रक चालक व प्रवाशाचा मृत्यू झाला. तर ट्रक क्लिनर वाचल्याने, त्याच्या तक्रारीवरून कोयना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये तिघांना अटक करून त्यांना 7 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा झाली. तर सुरेश भोर गेल्या 19 वर्षांपासून फरार होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी