Arnab Goswami: उल्हासनगरात भाजपाकडून अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 17:45 IST2020-11-04T17:45:35+5:302020-11-04T17:45:42+5:30
उल्हासनगर भाजपात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेची प्रतिक्रिया उलटली.

Arnab Goswami: उल्हासनगरात भाजपाकडून अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध
उल्हासनगर : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी यांच्या अटकेचा निषेधार्थ शहर भाजपाने शिवाजी चौकात आंदोलन केले. ठाकरे सरकारचा चौथा स्तंभावर हल्ला असून अश्या घटनेचा निषेध करीत असल्याची प्रतिक्रिया शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी दिली.
उल्हासनगरभाजपात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेची प्रतिक्रिया उलटली. भाजपाचे शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते हातात झेंडे व फलक घेवून दुपारी शिवाजी चौकात एकत्र आली. त्यांनी ठाकरे सरकार व महविकास आघाडीचा निषेध केला. संपादक अर्णब गोस्वामी यांना घरात मारहाण करून अटक केल्याचा निषेध केला असून हा चौथा स्तंभावर हल्ला असल्याचे ते म्हणाले.
आणीबाणी पेक्षाही ही परिस्थिती असल्याची टीका भाजपचे नगरसेवक मनोज लासी यांनी केली. यावेळी महाविकास आघाडी सरकार विरोधात घोषणाबाजी करून गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध केला. आंदोलनात शहराध्यक्ष जमनुदास पुरास्वानी यांच्यासह नगरसेवक मनोज लासी, राजेश वधारिया, महेश सुकरामानी, मंगला चांडा यांच्यासह पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.