आव्हाडांच्या जामीनावर कोर्टात युक्तिवाद, सरकारी वकिलांनी दिलं विरोधाचं कारण

By जितेंद्र कालेकर | Updated: November 15, 2022 13:32 IST2022-11-15T13:22:27+5:302022-11-15T13:32:57+5:30

आधीच्या जमिनीवरील अटींचा भंग: अटकपूर्व जमिनावर लवकरच निर्णय

Argument in court on bail of Awhad, direct opposition of government lawyers in thane court | आव्हाडांच्या जामीनावर कोर्टात युक्तिवाद, सरकारी वकिलांनी दिलं विरोधाचं कारण

आव्हाडांच्या जामीनावर कोर्टात युक्तिवाद, सरकारी वकिलांनी दिलं विरोधाचं कारण

जितेंद्र कालेकर

ठाणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दाखल केलेल्या  विनयभंगाच्या आरोपांच्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी आता मंगळवारी दुपारी होणार आहे. दोन्ही बाजूकडील युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर ठाण्याचे सत्र न्यायाधीश प्रणय गुप्ता यांनी दुपारच्या सत्रानंतर अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी घेण्याचे जाहीर केले. 

आव्हाड यांच्या विरोधात राजकिय वैमनस्यातून भाजपच्या पदाधिकारी महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून यात स्पर्श करण्यामागे तसा कोणताही कथित आरोपी तथा आपले अशील आव्हाड यांचा हेतू नव्हता.  मुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमात गर्दी झाल्यामुळे ती बाजूला करताना त्यांनी बाजूला सरण्यास सांगताना तिला हात लागला, असे सांगत आव्हाड यांचे  वकील गजानन चव्हाण यांनी घटनास्थळी असलेला व्हिडिओ देखिल न्यायालयात सादर केला. तसेच हा विनयभंगाचा गुन्हा होउ शकत नसल्याचा युक्तिवाद केला. त्यावर सरकारी वकील वर्षा चंदने यांनी मात्र जमिनीला आक्षेप घेत फिर्यादी महिलेने हा प्रकार घडल्यानंतर तातडीने मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचे सांगून यात राजकीय दबाव नसल्याचे स्पष्ट केले. शिवाय, वर्तकनगर च्या गुन्ह्यात १२ नोव्हेंबर रोजी दिलेल्या जमिनाच्या अटींमध्ये पुन्हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा न करण्याची अटही, त्यांनी मोडली. जो व्हिडिओ सादर केला, त्यातही तिला स्पर्श केल्याचे स्पष्ट दिसते. आरोपी स्वतः आमदार असल्यामुळे तपासात दबाव आणण्याचीही शक्यता आहे. या दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्या. गुप्ता यांनी यावर दुपारच्या सत्रात सुनावणी घेण्याचे जाहीर केले.

काही अटी शर्थीवर न्यायालयाकडून आव्हाड यांना अटकपूर्व जमीन मिळण्याची शक्यता काही जेष्ठ वकिलांनी व्यक्त केली.

"या सुनावणीच्या वेळी ठाणे न्यायालयात अनेक वकील तसेच पोलीस अधिकारी यांनी गर्दी केली होती. न्यायालयाच्या आवारातही राजकिय कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
 

Web Title: Argument in court on bail of Awhad, direct opposition of government lawyers in thane court