अपूर्वा पाटीलची सुवर्णकामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 01:59 AM2019-10-02T01:59:50+5:302019-10-02T02:00:02+5:30

इंग्लंडमध्ये २६ ते २९ सप्टेंबर पार पडलेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये ठाण्याच्या अपूर्वा पाटील हिने ज्युदो प्रकारात सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे.

Apurva Patil's golden performance | अपूर्वा पाटीलची सुवर्णकामगिरी

अपूर्वा पाटीलची सुवर्णकामगिरी

googlenewsNext

ठाणे : इंग्लंडमध्ये २६ ते २९ सप्टेंबर पार पडलेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये ठाण्याच्या अपूर्वा पाटील हिने ज्युदो प्रकारात सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. ती आंतरराष्टÑीय सुवर्णपदक पटकावणारी जिल्ह्यातील पहिलीच ज्युदोपटू ठरली आहे.
विविध गटांत खेळवलेल्या ज्युदो स्पर्धेत २० देशांतील खेळाडूंनी सहभागी झाले होते. या स्पर्धेतील कॅडेट खुल्या वजनी गटात अपूर्वा हिने सात सामने खेळली. त्यामध्ये रविवारी झालेल्या अंतिम लढतीत तिने भारताला एक सुवर्णपदक जिंकून दिले. आजवर विविध राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिने पदके पटकावली असून यापूर्वी ती दोनदा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेली आहे. ती वयाच्या आठ वर्षांपासून सरस्वती क्रीडा संकुल येथे ज्युदोचा सराव प्रशिक्षक देवीसिंग राजपूत, सहशिक्षक भूपेंद्र सिंग राजपूत आणि साहिल मेंडन यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे. बारावीत शिकणाऱ्या अपूर्वा हिच्या यशामुळे सर्वच स्तरातून तिचे कौतुक होत आहे.

Web Title: Apurva Patil's golden performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे