अनिल परब यांचे रिसॉर्ट दिवाळीत जमीनदोस्त करणार; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

By नितीन पंडित | Updated: September 1, 2022 19:15 IST2022-09-01T19:15:30+5:302022-09-01T19:15:41+5:30

'दापोली येथील ट्विन रिसॉर्ट दिवाळीच्या आधी जमीनदोस्त केल्याशिवाय शांत बसणार नाही.'

Anil Parab's resort to break on Diwali;says BJP leader Kirit Somaiya | अनिल परब यांचे रिसॉर्ट दिवाळीत जमीनदोस्त करणार; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

अनिल परब यांचे रिसॉर्ट दिवाळीत जमीनदोस्त करणार; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

भिवंडी: ठाकरे सरकार काळातील भ्रष्टाचाराचे प्रतीक असलेलय अनिल परब यांच्या दापोली येथील ट्विन रिसॉर्ट दिवाळीच्या आधी जमीनदोस्त केल्याशिवाय आपण सुस्त बसणार नाही, असे वक्तव्य भाजपचे प्रवक्ते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी भिवंडीत केले. भाजपचे शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या धामणकर नाका मित्र मंडळाने यंदा गणेशोत्सवानिमित्त अयोध्या येथील राम मंदिराची प्रतिकृती उभारली असून या देखाव्याचे उदघाटन किरीट सोमय्या व आरसी पाटील यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी करण्यात आले, यावेळी सोमय्या बोलत होते. यावेळी शेट्टी यांनी सोमय्या यांच्या हाती गदा दिल्या नंतर गणेशाला अर्पण केलेली हीच गदा दापोलीच्या अनधिकृत रिसॉर्टवर आपटणार अशी प्रतिज्ञा सोमय्यांनी यावेळी केली. 

राज्यात जल्लोषात गणेशोत्सवास सुरवात झाली असल्याने महाराष्ट्रात हिंदुत्वाचे राज्य आले असून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या साक्षीने गणेशाच्या कृपेने मेट्रो पुन्हा एकदा रुळा वर आली आहे, पुढच्या काही दिवसात भिवंडीची मेट्रो देखील रुळावर येणार असल्याचा विश्वास देखील यावेळी सोमय्या यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार महेश चौघुले,पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण आदी व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी अयोध्या मंदिर प्रतिकृती देखावा त्याचबरोबर सीसीटीव्ही कॅमेरा प्रक्षेपणाचे उदघाटन करण्यात आले .

Web Title: Anil Parab's resort to break on Diwali;says BJP leader Kirit Somaiya