आंबिवलीत पूर्ववैमनस्यातून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 23:59 IST2018-02-02T23:58:58+5:302018-02-02T23:59:09+5:30

आंबिवली भागात सोनू सिंग या 35 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास घडली.

Ammunition Prejudice murder | आंबिवलीत पूर्ववैमनस्यातून हत्या

आंबिवलीत पूर्ववैमनस्यातून हत्या

कल्याण: येथील नजीक असलेल्या आंबिवली भागात सोनू सिंग या 35 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास घडली. या प्रकरणी अस्वल सिंग याला खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे.
अस्वलसिंग आणि मृत सोनू सिंग हे दोघेही शिकलगर समुदयाशी निगडित आहेत, अशी माहिती खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कदम यांनी दिली. या दोघांमध्ये पूर्ववैमनस्य होते, अशी माहिती त्यांनी दिली. धारदार शस्त्रानी सोनूची हत्या करण्यात आली आहे. जखमी अवस्थेत असलेल्या सोनूला केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु तत्पूर्वी त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. सोनूच्या समर्थकांनी रुग्णालयाच्या आवारात गर्दी केल्यानं परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे.

Web Title: Ammunition Prejudice murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू