उल्हासनगर भाजप व्यापारी सेलच्या शहराध्यक्षपदी अमित वाधवा, व्यापारी समस्या सोडविण्याचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 15:38 IST2025-12-05T15:36:17+5:302025-12-05T15:38:09+5:30
भाजपच्या व्यापारी सेलच्या शहराध्यक्षपदी अमित वाधवा यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती शहरजिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी दिली.

उल्हासनगर भाजप व्यापारी सेलच्या शहराध्यक्षपदी अमित वाधवा, व्यापारी समस्या सोडविण्याचे संकेत
उल्हासनगर : भाजपच्या व्यापारी सेलच्या शहराध्यक्षपदी अमित वाधवा यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती शहरजिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी दिली. आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते वाधवा यांना नियुक्तीपत्र जिल्हा कार्यालयात देण्यात आले.
उल्हासनगर औद्योगिक आणि व्यापारी शहर असून येथील लहान-मोठे व्यवसाय चालवणाऱ्या व्यापाऱ्यांच्या समस्या प्रभावीपणे सोडवण्यासाठी पक्षाच्या व्यापारी सेलच्या शहरजिल्हाध्यक्ष पदी अमित वाधवा यांची नियुक्ती केल्याची माहिती भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी दिली. तर आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते अमित वाधवा यांना व्यापारी सेल अध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी पक्षाचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. नियुक्तीनंतर वाधवा यांनी शहरातील व्यापाऱ्यांच्या समस्या प्राधान्याने ऐकून घेऊन, सरकारी दरबारी मांडून सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
शहरातील व्यापारी वर्गाला भेडसावणाऱ्या अडचणी दूर करून त्यांना व्यवसाय करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणार असल्याचे संकेतही वाधवा यांनी दिले. शहराध्यक्ष राजेश वधारिया यांनी वाधवा हे व्यापाऱ्यांना न्याय मिळून देणार असल्याचा विश्वास व्यक्त करून व्यापाऱ्यांनीही वाधवा यांच्या नियुक्ताबाबत समाधान व्यक्त केले.