एमएमआरए क्षेत्रातील सर्वच रुग्णालयांचे फायर, इलेक्ट्रीक आणि आॅक्सिजन आॅडिट होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 06:49 PM2021-04-26T18:49:40+5:302021-04-26T18:51:17+5:30

एमएमआर क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खाजगी रु ग्णालयांतील फायर, इलेक्ट्रिक आणि आॅक्सिजन सेफ्टीचे त्रयस्थ संस्थेमार्फत आॅडीट करण्याचे आदेश दिल्याची माहिती नगरविकासमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी ठाण्यात दिले.

All hospitals in the MMRA area will be subjected to fire, electric and oxygen audits | एमएमआरए क्षेत्रातील सर्वच रुग्णालयांचे फायर, इलेक्ट्रीक आणि आॅक्सिजन आॅडिट होणार

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

Next
ठळक मुद्दे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश रेमडेसिवीरचाही तुटवडा दूर होणार

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: एमएमआर क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खाजगी रु ग्णालयांतील फायर, इलेक्ट्रिक आणि आॅक्सिजन सेफ्टीचे त्रयस्थ संस्थेमार्फत आॅडीट करण्याचे आदेश दिल्याची माहिती नगरविकासमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी ठाण्यात दिले. ठाण्यातील वेदांत रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूनंतर त्यांनी ही माहिती दिली.
नाशिक तसेच विरार येथील रुग्णालयांमधील दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर सरकारी आणि खाजगी रु ग्णालयात आग लागणे किंवा आॅक्सिजन गळती झाल्याने दुर्घटना घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. या दुर्घटनांमध्ये
रु ग्णांना नाहक आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे एमएमआर क्षेत्रातील सर्वच रु ग्णालयाचे जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्त यांच्या देखरेखीखाली त्रयस्थ तज्ज्ञ संस्थेमार्फत फायर, इलेक्ट्रीक आणि आॅक्सिजन सेफ्टी आॅडीट करण्याचे आदेश शिंदे यांनी दिले आहेत. वेदांत
रु ग्णालयात घडलेल्या दुर्घटनेनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
* इतर राज्यातूनही आॅक्सिजनचा पुरवठा-
मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्यामुळेच सध्या सर्वत्र रुग्णालयांमध्ये आॅक्सिजन अपुरा पडत आहे. त्यामुळेच इतर राज्यातूनही राज्यात तसेच एमएमआर क्षेत्रात आॅक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. त्यासाठी हवाई, रेल्वे मार्गांचाही अवलंब केला जात असून हवेतून आॅक्सिजन घेण्यासाठीही प्लान्ट उभे करण्यात येत आहे. इतर राज्यातही हीच परिस्थिती आहे. ठाण्यातही येत्या दोन दिवसांमध्ये आॅक्सिजन निर्मिती प्लान्ट कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे त्याचाही ठाण्यातील रुग्णांना लवकरच फायदा होईल, असेही सूतोवाच एकनाथ शिंदे यांनी केले.
* रेमडेसिवीरचाही तुटवडा कमी होईल-
कोरोना रुग्णांना लागणारे रेमडेसिवीरच्या इंजेक्शनचाही कोटा ठाण्यासाठी वाढवून मिळाला आहे. त्यामुळे या इंजेक्शनचाही तुटवडा आता भरुन निघेल, असा दावाही पालकमंत्री शिंदे यांनी केला.

Web Title: All hospitals in the MMRA area will be subjected to fire, electric and oxygen audits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.