भिवंडीत पुन्हा अग्नितांडव ; मोती कारखान्याला भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 06:14 PM2021-04-06T18:14:21+5:302021-04-06T18:15:08+5:30

Fire : भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. 

Agnitandav again in Bhiwandi; Terrible fire to the pearl factory | भिवंडीत पुन्हा अग्नितांडव ; मोती कारखान्याला भीषण आग

भिवंडीत पुन्हा अग्नितांडव ; मोती कारखान्याला भीषण आग

Next

भिवंडी - भिवंडीत यंत्रमाग कारखाने , गोदाम तसेच मोती कारखाने मोठ्या प्रमाणात असून या कारखाण्यांना आगी लागल्याचा घटना नेहमीच घडत असतांना शहरातील आसबीबी परीसरात असलेल्या मोती कारखान्याला भिषण आग लागल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली आहे . 

या आगीत कारखाना जळून खाक झाला असून आगीचे नेमकी कारण अजूनही समजू शकले नाही . दरम्यान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. 

Web Title: Agnitandav again in Bhiwandi; Terrible fire to the pearl factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.