रजिस्टार कार्यालयात कर्मचार्‍यांचे लेखणी बंद आंदोलन; दस्त नोंदणीचे हाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 02:14 PM2020-07-28T14:14:06+5:302020-07-28T14:14:12+5:30

सदनशीर मार्गाने या आधी आंदोलने, धरणे धरुनही शासनाने या कर्मचारी ,अधिकाऱ्यांच्या मागण्या विचारात घेतल्या नाही.

Agitation to stop the writing of employees in the register office; Diarrhea registration status | रजिस्टार कार्यालयात कर्मचार्‍यांचे लेखणी बंद आंदोलन; दस्त नोंदणीचे हाल 

रजिस्टार कार्यालयात कर्मचार्‍यांचे लेखणी बंद आंदोलन; दस्त नोंदणीचे हाल 

googlenewsNext

ठाणे : येथील नोंदणी व मुद्रांक कार्यालयाच्या (रजिस्टार) कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज लेखणी बंद आंदोलन सुरु केले आहे.यामुळे विविध प्रकारचे महत्वपूर्ण दस्त नोंदणीसह विवाह रजिस्ट्रेशन,  प्रमाणपत्र आदीसाठी आलेल्यांचे हाल होत आहे. अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या नेतृत्त्वाखाली करण्यात आलेले आंदोलन राज्य भरातील रजिस्टर कार्यालयात सुरु असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. 

सदनशीर मार्गाने या आधी आंदोलने, धरणे धरुनही शासनाने या कर्मचारी ,अधिकाऱ्यांच्या मागण्या विचारात घेतल्या नाही. यामुळे संतापलेल्या या कर्मचाऱ्यांनी आज लेखणी बंद आंदोलन छेडले. ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण रजिस्टर कार्यालयां तील कामकाज बंद असल्यामुळे नागरिकांमध्ये मनस्ताप व्यक्त होत आहे. कोरोनाच्या या महामारीत, ऐन पावसात रजिस्टर कार्यालय गाठलेल्या या नागरिकांना लेखणी बंद आंदोलना ला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. येथील गडकरी रंगायतनजवळ असलेल्या या कार्यालयातील कर्मचारी उपस्थित असून ते लेखणी बंद आंदोलनात सहभागी असल्यामुळे काम करीत नाही.

बदलापूर, उल्हासनगर, कल्याण आदी ठिकाणच्या कार्यालयातील ही खरेदी, विक्रीच्या दस्त ऐवजांची नोंदणी बंद आहे. याप्रमाणेच मुंबई शहर जिल्हा 100% सहभागी असून पालघर जिल्ह्याचा लेखणीबंद आंदोलनात १००℅ सहभाग आहे. पुणे ग्रामीण बंद आहे. उस्मानाबाद, नागपूर, गडचिरोली, नांदेड,  नागपूर विभाग, हिंगोली जिल्हा, रायगड जिल्हा, अहमदनगर जिल्हा येथेही लेखणी बंद आहे.  

दुय्यम निबंधक नेवासा येथे नजरचुकीने कालचा दस्त आज नोंदणी केल्याचे या आंदोलकांनी निदर्शनात आणून दिले.  तर आज एकही नवीन दस्त नोंदणी नाही. कोल्हापूर जिल्ह्यात एका ही दस्तऐवजाची नोंदणी झालेली नाही,  शंभर टक्के सहभागी, लातूर जिल्हा, लातूर विभाग, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती, वाशिम जिल्ह्यातील सर्व अधिकारी कर्मचारी लेखनीबंद आंदोलनात सहभागी असल्याचे येथील नोंदणी व मुद्रांक कार्यालय अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेचे ठाणे शहरी- ग्रामीण अध्यक्ष विजय चव्हाण, सचिव प्रविण गिरी यांनी सांगितले.  या लेखणी बंद आंदोलनाची दखल राज्य शासनाने वेळीच घेणे आवश्यक आहे.

अन्यथा  4 आँगस्टपासून बेमुदत संपाचा आंदोलकांनी दिला आहे. तत्पूर्वी त्यांनी मंगळवारी हा एक दिवशीय लेखणी बंद आंदोलन सुरु केले आहे. या काम बंद आंदोलनाद्वारे कर्मचाऱ्यांनी सर्व संवर्गाच्या रखडलेल्या पदोन्न त्या तत्काळ कराव्यात याव्या या प्रमुख मागणीसह अन्य ही मागण्या लाऊन धरल्या आहेत. या आंदोलकांनी प्रमुख मागण्यामध्ये मुंबई विभागातील मुद्रांक जिल्हाधिकारी पदे विभागातून पदोन्नतीने भरावी, कोरोनामुळे दगावलेल्यांच्या परिवारास 50 लाखांची मदत तत्काळ देऊन परिवारातील एकास नोकरीला घ्यावे.

सर्व कर्मचाऱ्यां ना 50 लाखांचा विमा कवच लागू करा. पीएमएची रक्कम कार्यालय व जनतेच्या सुविधेसाठी वापरण्यात यावी. रेरा अंतर्गत झालेल्या कारवायांना मागे घेण्यात यावे, सह दुय्यम निबंधक वर्ग 2 व दुय्यम निबंधक श्रेणी 1 या पदांचे एकत्रीकरण करा. हार्डवेअर चे साहित्य उच्च दर्जाचे द्या आदी मागण्यासाठी या कर्मचाऱ्यांकडून लेखणी बंद,  काम बंद आंदोलन अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या नेतृत्त्वाखाली छेडण्यात येत आहे. 

Web Title: Agitation to stop the writing of employees in the register office; Diarrhea registration status

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे