सफाई कामगार आयोगाच्या दौऱ्यानंतर उल्हासनगर महापालिकेकडून सफाई कामगारांना नियुक्तीपत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 19:57 IST2025-07-01T19:57:56+5:302025-07-01T19:57:56+5:30
तब्बल १८ सफाई कामगारांना नियुक्तीपत्र देऊन टप्प्याटप्प्याने इतर कामगारांच्या भरतीचे संकेत दिले.

सफाई कामगार आयोगाच्या दौऱ्यानंतर उल्हासनगर महापालिकेकडून सफाई कामगारांना नियुक्तीपत्र
उल्हासनगर : महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शरसींग रुक्कनतसिंग डागोर यांनी महापालिका दौरा करून रिक्त ५६ सफाई कामगारांचे पदे भरण्याचे आदेश आयुक्ताना दिले होते. आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी सोमवारी तब्बल १८ सफाई कामगारांना नियुक्तीपत्र देऊन टप्प्याटप्प्याने इतर कामगारांच्या भरतीचे संकेत दिले.
उल्हासनगर महापालिका सफाई कामगारांच्या समस्या समजून घेऊन, त्या सोडविण्यासाठी व शासनाने दिलेल्या सुविधा मिळतात की नाही. याबाबत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शरसींग रुक्कनतसिंग डागोर यांनी शुक्रवारी महापालिकेचा दौरा केला. त्यांनी सफाई कामगार, कामगार नेते, आयुक्त मनिषा आव्हाळे व अन्य अधिकाऱ्या सोबत चर्चा केली. त्यावेळी लाड-पागे समिती अंतर्गत वारसाहक्काच्या ५६ सफाई कामगारांचे पदे रिक्त असल्याची माहिती उघड झाली. रिक्त पदे त्वरित भरण्याचे आदेश आयोगाचे अध्यक्ष डागोर यांनी दिल्यावर, आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी त्याची अंमलबजावणी सुरु केली. सोमवारी वारसाहक्कातील १८ सफाई कामगारांना नियुक्तपत्र देऊन इतर पदे टप्प्याटप्प्याने लवकरात लवकर भरण्याचे संकेत दिले. आयुक्तांच्या निर्णयाचे कामगार नेते चरणसिंग टाक, राधाकृष्ण साठे आदीने स्वागत केले.
महापालिका सफाई कामगाराला सेवा देण्यात २५ वर्षे झाली. त्यांना श्रम श्राफल्य योजने अंतर्गत मोफत घरे देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या आरोग्यासाठी कॅशलेस १० लाखाचे कार्ड देणे, शासनाचे सार्वजनिक सुट्टी व साप्ताहिक सुट्टी लागू करणे, दिव्यांग कामगारांना त्यांच्या दिव्यांगाच्या प्रमाणात काम देणे, शिक्षित सफाई कामगारांना पदोन्नती देणे आदी सफाई आयोगाच्या मागण्याची अंमलबजावनी करण्याचे संकेतही आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी दिले. आयुक्त आव्हाळे यांच्या निर्णयाने कामगार नेते, सफाई कामगार यांच्यात आनंदाचे वातावरण असून अतिरिक्त आयुक्त किशोर गवस, उपायुक्त विशाखा मोटघरे, दीपाली चौगुले, सहाय्यक आयुक्त अजय साबळे, सुनील लोंढे यांनीही महत्वाची भूमिका वठविली आहे.