पावसाच्या विश्रांतीनंतर, महावितरणकडून वीज पूरवठा सुरळीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 21:49 IST2019-07-28T21:47:40+5:302019-07-28T21:49:21+5:30
मोहने पंपिंग स्टेशनला कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता रफिक शेख यांनी भेट दिली होती.

पावसाच्या विश्रांतीनंतर, महावितरणकडून वीज पूरवठा सुरळीत
डोंबिवली: महावितरणची डोंबिवली, कल्याण वेस्ट, रेतीबंदर, मोहणे, सर्वोदय, विठ्ठलवाडी, बदलापूर, मराळ, वडप, टिटवाळा आदी भागातील रोहित्र पावसामुळे ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बंद ठेवण्यात आली होती. यातील बहुतांश रोहित्र व ग्राहकांचा वीज पुरवठा सुरू करण्यात आला आहे.
मोहने पंपिंग स्टेशनला कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता रफिक शेख यांनी भेट दिली होती. या पंपिंग केंद्राचा वीज पुरवठा महावितरणकडून सूरु करण्यात आला आहे. अपवादात्मक बंद असलेल्या ग्राहकांचा पुरवठा, पावसाचे पाणी ओसरल्यानंतर सुरक्षेचा आढावा घेऊन टप्याटप्याने सुरू करण्यात येत आहे. काही ठिकाणी तांत्रिक बिघाड झाले आहेत ते दुरुस्त करण्यात येत असल्याची माहिती महावितरणचे कल्याण विभाग प्रभारी उपमुख्य जनसंपर्क अधिकारी विश्वजीत भोसले यांनी दिली.