शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
4
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
5
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
7
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
8
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
9
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
10
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
11
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
14
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
15
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

ठाण्यात ४४ अतिधोकादायक इमारतींवर लवकरच होणार कारवाईचा हातोडा

By जितेंद्र कालेकर | Published: July 16, 2020 12:00 AM

ऐन पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी ठाणे महानगरपालिका प्रशासनाकडून धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींंना नोटिसा बजावण्यात येत आहेत. सध्या ७९ पैकी ३५ अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांनी इमारती रिक्त केल्या असून ४४ इमारतींवर येत्या काही दिवसांमध्ये कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्दे ७९ पैकी ३५ इमारती रहिवाशांनी केल्या रिक्त महापालिका प्रशासनाची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणेकरांवर एकीकडे कोरोनाचे संकट घोंघावत असताना दुसरीकडे धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. ऐन पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी ठाणे महानगरपालिका प्रशासनाकडून धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींंना नोटिसा बजावण्यात येत आहेत. सध्या ७९ पैकी ३५ अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांनी इमारती रिक्त केल्या असून ४४ इमारतींवर येत्या काही दिवसांमध्ये कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये मुंब्रा, कळवा आणि वागळे इस्टेट या प्रभाग समित्यांच्या क्षेत्रामध्ये ऐन पावसाळ्याच्या दरम्यान धोकादायक इमारती कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर अतिधोकादायक तसेच धोकादायक इमारतींमधील कुटुंबीयांचे अन्यत्र स्थलांतर करून त्या रिकाम्या करण्यास पालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे. येत्या काही दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संकटात ऐन पावसाळ्यात शेकडो ठाणेकरांवर अगदी हक्काचे घर सोडण्याचीही नामुश्की येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ज्या दुरुस्त करून पुन्हा वास्तव्य करता येणे शक्य आहे, अशा इमारतींना दुरुस्त करून त्याबाबतचा अहवाल महापालिकेकडे देण्याच्याही नोटिसा काही इमारतींना बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली.* ४३०० इमारती धोकादायकमहापालिकेने घोषित केलेल्या धोकादायक इमारतींपैकी सी-१ हा अतिधोकादायक इमारतींचा प्रकार असून अशा इमारती नोटीस बजावल्यानंतर काही कालावधीनंतर जमीनदोस्त केल्या जातात. तर, सी-१-ए मधील म्हणजे धोकादायक इमारती रिकाम्या करून त्यांचे संरचनात्मक परीक्षण केले जाते. यंदा सर्वेक्षणामध्ये ठामपाच्या क्षेत्रातील नऊ प्रभाग समित्यांमधील सुमारे चार हजार ३०० धोकादायक इमारतींची यादी आहे. त्यामध्ये अतिधोकादायक ७९ इमारतींचा समावेश आहे. त्यापैकी ३५ इमारती रिक्त केल्या असून आता केवळ ४४ इमारती या प्रकारामध्ये शिल्लक आहेत. त्याही रिक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे.*घरे खाली करण्यास रहिवाशांचा नकारसी-२-ए मध्ये ११३ इमारतींचा समावेश आहे. यातही सुमारे १५० पेक्षा अधिक कुटुंबे ही धोकादायक इमारतींमध्ये जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत आहेत. या इमारतींमधील रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा महापालिकेने बजावल्या आहेत. मात्र, कोरोना आणि पावसाळ्याच्या दुहेरी संकटामुळे अनेक इमारतींमधील रहिवाशांनी त्या रिक्त करण्यास नकार दिला आहे.अशा वेळी ज्या इमारती कधीही कोसळण्याच्या म्हणजे अतिधोकादायक स्थितीमध्ये आहेत, त्या शक्य होईल तितक्या लवकर रिकाम्या करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.कोपरी- नौपाडयाला सर्वाधिक धोकाठाणे महापालिकेने केलेल्या सर्व्हेक्षणामध्ये ठाण्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या कोपरी- नौपाड्यात सर्वाधिक ३७ अतिधोकादायक इमारती आहेत. त्यानंतर मुंब्रा भागात १४ इमारतींचा समावेश असून वर्तकनगरमध्ये नऊ इमारती आहेत. त्याचबरोबर उथळसर ७, लोकमान्यनगर सावरकरनगर प्रभाग समितीमधील कामगार रुग्णालय वसाहतीच्या पाच इमारती, कळवा- तीन, दिवा आणि वागळे इस्टेटमध्ये प्रत्येकी एका अतिधोकादाक इमारतीचा समावेश आहे.तब्बल चार हजार इमारती दुरुस्तीच्या प्रतिक्षेतठाण्यातील चार हजार ११३ इमारतींना सध्या दुरुस्तीची गरज आहे. यामध्ये सी- २ बी या इमारत रिकामी न करता दुरु स्ती करण्यायोग्य असलेल्या दोन हजार २८३ इमारती आहेत. तर सी- ३ या किरकोळ दुरु स्ती करण्यायोग्य असलेल्या एक हजार ८३० इमारतींचा समावेश आहे. या सर्व इमारतींना दुरु स्त करुन वास्तव्य करण्याच्या नोटीसा संबंधित गृहसंकुलांना पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

 

‘‘ ठाणे शहरात ७९ अती धोकादायक इमारती होत्या. त्यापैकी ३५ इमारती या रहिवाशांनी रिकाम्या केल्या आहेत. उर्वरित इमारती देखिल रिकाम्या करण्यासाठीची प्रक्रीया युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. ’’अशोक बुरपुल्ले, उपायुक्त, ठाणे महानगरपालिका 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिका