शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पुन्हा मैदानात, आंतरवालीत ३० मे पासून आंदोलनाची घोषणा
2
Abu Bilal ISIS leader killed : मोठी कारवाई! अमेरिकेने आयसिसचा नंबर २ चा नेता उडवला; नायजेरियाच्या जंगलात अबू बिलालचा खात्मा
3
स्वतःचे कोचिंग सेंटर सुपरहिट करण्यासाठी कुलकर्णीने लीक केला NEETचा पेपर; पण विद्यार्थ्याने एक चूक केली अन्..
4
Hantavirus माणसाच्या शरीरात किती काळ राहतो? वैज्ञानिकांनाही मिळेना उत्तर; संशोधन सुरू
5
गाझामध्ये इस्रायलचा थरकाप उडवणारा एअर स्ट्राईक; हमासच्या सर्वात मोठ्या लष्करी कमांडरला केले टार्गेट
6
विमानात चिनी वस्तूंना नो एन्ट्री! ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी कठोर पाऊल; भेटवस्तूही डस्टबिनमध्ये फेकल्या
7
Mumbai Crime: पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी बोलावले, दारू पाजून गळा चिरला; अनैतिक संबंधांचा संशय,  फरार पतीला अटक
8
LPG बाबत चांगली बातमी आली समोर, काय आहेत लेटेस्ट दर? बुक करण्यापूर्वी जाणून घ्या
9
Petrol Diesel Price: पुढील ३-४ महिन्यांत पेट्रोल-डिझेलच्या किमती आणखी वाढणार? तज्ज्ञांचा महत्त्वाचा इशारा!
10
मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकवर काही तासांत दोन भीषण अपघात; ३ ठार, अनेकजण जखमी!
11
LSG चा कर्णधार ऋषभ पंतवर बीसीसीआयची कारवाई; CSK विरुद्ध सामन्यात त्याच्याकडून झाली चूक!
12
"माझ्या दुःखाचे कारण माझी पत्नीच..." लग्नानंतर ९ वर्षांनी इंजिनिअरने संपवले जीवन, व्हॉट्सॲपवर ठेवला स्टेटस
13
१७ ते २३ मे : अडलेल्या कामांना गती देणारा काळ, फक्त घ्या 'ही' काळजी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
14
कांदा १२.३५ रुपये किलो दराने खरेदी करणार, ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
15
'इराण अण्वस्त्रे बाळगू शकत नाही', ट्रम्प यांच्या भेटीनंतर शी जिनपिंग यांनी होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यास सहमती दर्शवली
16
Gold Silver Price Today May 16: चांदी ₹२० हजारांपेक्षा अधिकनं घसरली, सोनंही धडाम, पाहा २४K, २२K, १८K गोल्डचा रेट
17
NEET पेपरफुटी प्रकरणात CBI ची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधाराला अटक, पेपर कसा फुटला?
18
‘काही बेरोजगार हे झुरळासारखे, ते पुढे आरटीआय कार्यकर्ते बनतात’, सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी याचिकाकर्त्याला  सुनावले
19
न्यायालयावर निर्णय लांबविण्याचा आरोप करणे थांबवा; कोर्टाचा उद्धवसेनेला इशारा
20
आर्थिक संकट, सोन्याची दरवाढ, अन्...; बाबा वेंगाने २०२६ बाबत वर्तवली होती काळजीत टाकणारी भाकितं! खरी ठरणार? 
Daily Top 2Weekly Top 5

कृती आराखड्यातून डोंबिवलीला बगल

By admin | Updated: April 4, 2016 02:01 IST

देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर असा कलंक ललाटी लागलेल्या डोंबिवली शहराचा राज्यातील १० शहरांमधील प्रदूषण रोखण्याकरिता पर्यावरण मंत्रालयाने तयार

मुरलीधर भवार,  डोंबिवली
देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर असा कलंक ललाटी लागलेल्या डोंबिवली शहराचा राज्यातील १० शहरांमधील प्रदूषण रोखण्याकरिता पर्यावरण मंत्रालयाने तयार केलेल्या कृती आराखड्यात समावेश करण्यात आलेला नसल्याबद्दल पर्यावरणप्रेमींच्या वर्तुळात आश्चर्य व खेद व्यक्त करण्यात येत आहे.
डोंबिवलीतील औद्योगिक कारखान्यांतून होणाऱ्या प्रदूषणाचा प्रश्न गेली २५ वर्षे गाजत आहे. गतवर्षी याच प्रदूषणामुळे येथे पडलेला हिरवा पाऊस देशभर गाजला होता. याच शहरातील प्रदूषणाकडे काणाडोळा केल्यामुळे राष्ट्रीय हरित लवादाने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा गाशा गुंडाळण्याचे कठोर आदेश दिले. येथील तलावातील मासे प्रदूषणामुळे मरण पावण्याची घटना घडली आहे. डोंबिवलीमधील प्रदूषणाचे एवढे दाखले असतानाही केवळ १० लाख लोकसंख्येच्या निकषात एकट्या डोंबिवली शहराचा यादीत समावेश करणे अशक्य असल्याने केलेला नाही. कल्याण-डोंबिवली या दोन्ही शहरांची एकत्र लोकसंख्या १५ लाखांच्या घरात असून दोन्ही शहरांना प्रदूषणाची समस्या भेडसावत आहे.
पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी अलीकडेच विधान परिषदेत असे जाहीर केले की, मुंबई, नवी मुंबई, औरंगाबाद, अमरावती, चंद्रपूर, कोल्हापूर, पुणे, नागपूर, नाशिक आणि सोलापूर या शहरांतील प्रदूषण रोखण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे काम आयआयटी पवई आणि निरी या संस्थेला दिले आहे. प्रत्येक शहराच्या कृती आराखड्यासाठी ७५ लाख रुपये खर्च येणार आहे. १० शहरांच्या कृती आराखड्याकरिता ५ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्या शहरांची लोकसंख्या १० लाख किंवा त्यापेक्षा जास्त आहे, त्याचाच या योजनेत समावेश आहे.
केंद्रीय पर्यावरण खात्याने तयार केलेल्या अहवालानुसार २००९ साली डोंबिवली शहर प्रदूषणात क्रमांक दोनवर होते. देशातील प्रदूषित शहरांत डोंबिवलीचा क्रमांक १४ वा होता. २०१० साली केंद्रीय पर्यावरण खात्याच्या यादीतही डोंबिवली प्रदूषणात अव्वल राहिली. गेली दोन वर्षे डोंबिवली औद्योगिक वसाहतीत हिरवा पाऊस पडला होता. ‘वनशक्ती’ या संंस्थेने हाती घेतलेल्या ‘सेव्ह उल्हास रिव्हर’ या प्रकल्पांतर्गत डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर परिसरातील रासायनिक कारखान्यांतून बाहेर पडणाऱ्या रसायनमिश्रित पाण्यावर योग्य प्रक्रिया केली जात नाही, ही बाब राष्ट्रीय हरित लवादाकडील याचिकेत नमूद केली. डोंबिवली औद्योगिक कारखान्यांतून प्रदूषण होत असल्याचे केंद्रीय हरित लवादाने मान्य करीत दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र प्रदूषण मंडळच बंद करण्याचा आदेश दिला आहे.
लोकसभा निवडणुकीच्यावेळी प्रचार सभेत शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रदूषण दूर करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांना याचा सोयीस्कर विसर पडल्याचे पर्यावरणवाद्यांचे मत आहे.