शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

कंटेनमेंट झोनसाठी अ‍ॅक्शन प्लान, ठाणे महापालिकेने उचलली पावले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2020 12:24 AM

३० पथके तैनात । कोरोना रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने उचलली पावले

ठाणे : ठाणे शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली, तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे ठाणेकरांसाठी ही समाधानाची बाब मानली जात आहे. परंतु, आता कंटेनमेंट झोनमधूनही कोरोनाला हद्दपार करण्यासाठी महापालिकेने अ‍ॅक्शन प्लान तयार केला आहे. त्यानुसार, या भागाचे येत्या चार दिवसांत पूर्णपणे सर्वेक्षण केले जाणार आहे. यासाठी प्रत्येक कंटेनमेंट झोनमध्ये २० ते ३० पथके तयार करून घरोघरी जाऊन सर्व नागरिकांची तपासणी सुरू केली आहे.

ठाण्यात झोपडपट्टीतील कोरोना रोखण्यात अद्यापही महापालिकेला यश आलेले नाही. त्यातल्या त्यात लोकमान्य-सावरकरनगर भागात रुग्णवाढीची संख्या मागील काही दिवसांत घटली आहे. या भागांत महापालिका घरोघरी जाऊन तपासणी करून एखाद्याला ताप असेल किंवा आणखी काही त्रास होत असेल, तर त्याला लगेचच क्वारंटाइन करून तीन ते चार दिवसांनी त्याची कोरोना चाचणी करीत आहे. यामुळे रुग्णवाढीचा दर हा ४० ते ५० वरून २० पर्यंत खाली आला आहे. परंतु वागळे, कोपरी, नौपाडा, मुंब्रा आणि आता उथळसर भागात बाधितांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे लोकमान्यनगर भागात जो अजेंडा राबविला, तोच या प्रभाग समित्यांमध्येही राबविला जाणार आहे.सहायक आयुक्तांवर विशेष जबाबदारीठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे अधिकाऱ्यांशी चर्चा करून कंटेनमेंट झोनमध्ये येत्या चार दिवसांत प्रत्येक घराची तपासणी करण्याचे आदेश दिले. महापालिकेच्या उपायुक्तांनी हा अ‍ॅक्शन प्लान तयार केला असून त्यासाठी प्रत्येक प्रभाग समितीअंतर्गत आता २० ते ३० पथके सज्ज केली असून ती थर्मल स्कॅनिंग करून इतर तपासणीही करणार आहेत. यानुसार, प्रत्येक सहायक आयुक्ताला विशेष जबाबदारी दिली आहे. तसेच या भागांमध्ये फिव्हर क्लिनिक उभारून त्याठिकाणीदेखील तपासणी मोहीम हाती घेतली आहे. यासाठी स्थानिक नगरसेवकांची मदत घेऊन प्रत्येक घर पिंजून काढले जात आहे.13,270 नागरिकांची तपासणीठाणे महापालिकेने ५ जूनपर्यंत नऊ प्रभाग समितीअंतर्गत १३,२७० नागरिकांची तपासणी केली असून यातील ५८ जणांत तापाची लक्षणे आढळल्याने २० नागरिकांना होम क्वारंटाइन करून आठ जणांना कळवा रुग्णालयात दाखल केले आहे. तसेच २८ नागरिकांना महापालिकेच्या विलगीकरण कक्षात दाखल केल्याची माहिती उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका